June 29, 2025 4:49 am

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस अमळनेरमध्ये उत्साहात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस अमळनेरमध्ये उत्साहात साजरा

प्रतिनिधी तेजश्री प्रवीण पाटील

अमळनेर (ता. ६ एप्रिल) – भारतीय जनता पक्षाचा ४४ वा स्थापना दिवस आज अमळनेर तालुक्यात उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. मराठा मंगल कार्यालय येथे खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला तालुक्यातील कार्यकर्ते  उपस्थित होते. पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणादायी भाषण लाईव्ह स्क्रीनद्वारे दाखविण्यात आले. आपल्या संबोधनात त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना राष्ट्रहितासाठी समर्पित राहण्याचे आवाहन केले.
या विशेष दिवशी जनसंघाच्या काळापासून पक्षासाठी अविरत कार्य करणारे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा चौधरी यांनी नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अनुभवातून त्यांनी भाजपच्या विचारधारेची व्याख्या करत, कार्यकर्त्यांनी निष्ठेने व एकनिष्ठतेने समाजसेवेत गुंतण्याचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमात पक्षाच्या स्थापनेपासून निःस्वार्थ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते जेष्ठ नेते सुभाष चौधरी, जिजाब पाटील, सोमा ठाकूर, एन डी तात्या, हरचंद लांडगे, गणेश चौधरी, श्यामकांत भावसार, सुभाष पाटील, सुपडू खाटीक,भिका साहेबराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.त्यांचा यथोचित गौरव करत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला तालुक्यातील व शहरातील माजी सभापती श्याम अहिरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, खा शी संचालक माधुरी पाटील, कल्याणी पाटील,सरचिटणीस राकेश पाटील,महेंद्र पाटील, गोकुळ परदेशी, दिलीप ठाकूर, विक्रांत पाटील, समाधान पाटील,देवा लांडगे,भास्कर पाटील,मच्छिंद्र राजपूत, सुभाष पाटील,गणेश बडगुजर, समाधान पाटील,राहुल चौधरी, किरण बोरसे व विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्ट प्रकारे पार पडले असून, यानिमित्ताने नव्या जोमाने संघटन बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!