June 29, 2025 9:31 am

दहेली येथे आदर्श ग्राम निर्मितीचा दिशादर्शक सोहळा संपन्न…

अपनी भाषा में पढ़े! Translate

दहेली येथे आदर्श ग्राम निर्मितीचा दिशादर्शक सोहळा संपन्न…

कर्मयोगीच्या प्रयत्नातून दहेली आदर्श ग्राम होणार…

कर्मयोगी फाऊंडेशन हे कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रासंत तुकडोजी महाराज यांची विचारसरणी जपत कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.
ग्रामीण भागात आनंदाचे खेळीमेळीचे व समृद्धीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी कर्मयोगीने नागपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहेली गावाची आदर्श ग्राम निर्मितीसाठी निवड केली आहे.
त्यासाठी दिनांक ७ एप्रिल २०२५ रोज सोमवारला दहेली ता. जिल्हा नागपूर येथे आदर्श गाव व आर्थिक सुखसंपन्नतेकडे दहेली गावची वाटचाल करण्यासाठी दिशादर्शक पायाभरणी व मार्गदर्शक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर फर्स्टचे संचालक तन्वीर मिर्झा, उदघाटक आजीवन ग्रामगीता प्रचारक ज्ञानेश्वर दादा रक्षक, प्रमुख मार्गदर्शक
राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज विद्यापीठ, नागपुर आंतर्विद्याशाखीय अभ्यासशाखेचे अधिष्ठाता, डॉ. प्रशांत कडू कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे विशेष उपस्थितीमध्ये माजी सरपंच रंजना कालवडे दहेली ग्रामचे सचिव कैलास मानकर दहेली ग्रामचे कर्मयोगी फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय वानखेडे हि मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती..


सर्वप्रथम राष्ट्रसंताची सामुदायिक प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली यावेळी उदघाटनिय भाषणात ज्ञानेश्वर दादा रक्षक यांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्व गावकरी मंडळींना समजून सांगितले. अध्यक्षीय भाषणात तन्वीर मिर्झा म्हणाले की गाव आदर्श करण्यासाठी सर्वप्रथम गावकरी मंडळींनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे. गावात खेळीमेळीचे व प्रेमाचे वातावरण निर्माण झाले की सामूहिक प्रयत्नातून आदर्श गाव निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. ज्ञानेश्वर दादा रक्षक, डॉ. प्रशांत कडू व कर्मयोगी फाऊंडेशन सारखं प्रामाणिक फाऊंडेशन आपल्या सोबत असल्यामुळे दहेली गाव नक्कीच सुंदर व समृद्ध होणार. प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रशांत कडू यांनी सांगितले की ग्रामीण भागाचा विकास होणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे दहेली गाव आदर्श होण्यासाठी मी माझी संपूर्ण विध्यार्थी टीम कार्यरत करेल असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले..
गावकरी मंडळींनी सुद्धा आपले गाव आदर्श करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपली सहमती दर्शवली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी परिवार व दहेली ग्रामवासी यांनी यशस्वी प्रयत्न केले..

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!