राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर ‘रवी ज्वेलर्स’च्या भव्य शोरूमचे उद्घाटन
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी अमळनेरकरासाठी सोन्या चांदीचे मोठे झालं दालन
अमळनेर – विक्की जाधव
अमळनेर शहरातील 1994 पासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले ‘रवी ज्वेलर्स’ या प्रतिष्ठानाच्या नवीन भव्य शोरूमचे उद्घाटन राम नवमीच्या मंगलप्रसंगी मोठ्या थाटात पार पडले. या वेळी मोठ्या संख्येने ग्राहकांची उपस्थिती होती.
नवीन शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी ‘रवी ज्वेलर्स’चे मालक म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांनी आम्हावर दाखवलेल्या प्रेमामुळेच आज या नव्या शोरूमचे स्वप्न साकार झाले आहे. यामध्ये ग्राहकांना देश-विदेशातील विविध प्रकारच्या आधुनिक व पारंपरिक डिझाइन्स पाहायला मिळतील.”
या शोरूममध्ये रोज गोल्ड, शाईन गोल्ड तसेच सोन्याचे इतर अनेक आकर्षक प्रकार उपलब्ध असून, दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इन्शुरन्सची सुविधा देखील देण्यात येत आहे.
ग्राहकांसाठी एकाच ठिकाणी दर्जेदार व विविध प्रकारच्या दागिन्यांचा अनुभव घेण्याची ही उत्तम संधी असून, ‘रवी ज्वेलर्स’च्या नव्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.