सौ.सीमाताई रंधे यांना दै. लोकमत तर्फे कर्तुत्वान महिला विशेष पुरस्काराने सन्मानित.. परीट महिला मंडळाच्या वतीने सत्कार..
शिरपूर : दै. लोकमत तर्फे कर्तुत्वान महिला विशेष पुरस्काराने सौ. सीमाताई रंधे यांना गौरविण्यात आले. या नंतर भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून शिरपूर परीट महिला मंडळाने सौ सीमाताई रंधे यांचा सत्कार केला. . सामाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या महिला खास करून सौ. रंधे यांच्या यशोगाथेचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचा उद्देश म्हणजे महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करणे.
सौ.सीमाताई रंधे यांचे अभिनंदन करताना अशोकदादा बेडिस्कर व सविताताई बेडिस्कर..
सौ. सीमाताई रंधे यांना या पुरस्कारासोबतच त्यांच्या नावलौकिक कार्याची योग्य दखल घेण्यात आली, ज्यामध्ये त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणे समाविष्ट आहे. त्यांनी त्यांच्या सामुदायिक कार्यांमधून अनेक महिलांना प्रेरित केले आहे. सौ. सीमा ताई रंधे यांना दिलेल्या पुरस्कारामुळे शिरपूर परीट महिला मंडळामध्ये महिलांच्या कार्याबद्दल एक भव्य सन्मान वृद्धिंगत झाला आहे. दै. लोकमत कर्तुत्वान महिला विशेष पुरस्कारात त्यांच्या कार्याची दखल घेणे म्हणजे समाजात महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठा पाऊल आहे.
सौ.सीमाताई रंधे यांचे अभिनंदन करताना सुनील सूर्यवंशी व दिपाली सूर्यवंशी..
शिरपूर परीट महिला मंडळ अध्यक्षपदी दिपाली सूर्यवंशी व उपाध्यक्षपदी सुनीता जाधव यांची बिनविरोध निवड..
महिला मंडळाची सालाबादाप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सौं. सीमाताई रंधे व आशाताई रंधे , रजनीताई लुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीचा वातावरणात मीटिंग संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सीमाताई रंधे यांना कर्तृत्वान महिला म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे सौ. सुरेखाताई बेडिस्कर व दिपाली सूर्यवंशी यांनी मंडळाच्या वतीने अभिनंदन केले. त्यानंतर शिरपूर शहरात परीट महिलांचा सहभाग व सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी शिरपूर परीट महिला मंडळाच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. दिपाली सूर्यवंशी यांची अध्यक्षपदी, तर सुनीता जाधव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सुरेखाताई बेडिस्कर यांनी नवनिश्चित नियुक्त अध्यक्ष दिपाली सूर्यवंशी यांच्याकडे अध्यक्षपदाचा सूत्र हाती दिले. शिरपूर शहराच्या परीट मंडळाची नवीन कार्यकारणी तयार करण्यात आले. या निवड प्रक्रियेमध्ये महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला आणि नवनियुक्त पदधारकांना शुभेच्छा दिल्या.