भिगवण येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ प्रदेशअध्यक्ष श्री खंडेराव कडलक साहेब यांचा सत्कार
नुकत्याच झालेल्या शिर्डी येथील कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र प्रदेश धोबी सेवा मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर
श्री. खंडेराव कडलक- प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ,जेष्ठ नेते एकनाथराव बोरसे,गोविंद राऊत प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लॉन्ड्री संघटना यांचा भिगवन येथे यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी सन्मान करताना पुणे युवक जिल्हा उपाध्यक्ष राहुल कदम, इंदापूर तालुका युवक अध्यक्ष निलेश गायकवाड व कार्यकर्ते यांच्या हस्ते भिगवन येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या समाज मंदिरामध्ये सत्कार करण्यात आला.
कडलक साहेबांनी येणाऱ्या काळात परीट समाजातील अडीअडचणी जाणून घेऊन प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत तसेच समाज संघटन मजबूत करण्या वरती ते जोर देणार आहे असे बोलताना सांगितले.