शिरपूर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या या संस्थेच्या संचालक बिनविरोध निवड, चेअरमनपदी बबनराव चौधरी तर व्हा. चेअरमनपदी मोहन सोनवणे
शिरपुर : शिरपूर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. ता. शिरपूर, जि. धुळे या संस्थेच्या व्यवस्थापक समितीची संचालक मंडळची निवडणुक बिनविरोध झाली असुन चेअरमन व व्हा. चेअरमन निवड ही बिनविरोध झाली आहे. शिरपुर तालुक्यातील शिरपूर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. शिरपूर, जि. धुळे या संस्थेची संचालक मंडळची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली होती. संचालक मंडळामध्ये सर्वसाधारण मतदार संघातील संचालक म्हणुन पाटील दिपक पुरुषोत्तम शहादा, जि. नंदुरबार, सोनवणे मोहन दयाराम मु.पो. मांडळ, ता. शिरपूर, जि. धुळे, पाटील संभाजी हिरामण मु.पो. बाळदा, ता. शिरपूर, जि. धुळे, पाटील प्रविण जाधव मु.पो. कहाटुळ, ता. शहादा, जि. नंदुरबार, चौधरी प्रशांत बबनराव शिरपूर, पाटील अविनाश गोविंद शिरपूर, अग्रवाल महेशकुमार रामेश्वर शिरपूर, महिला प्रतिनिधी संचालिका म्हणुन डॉ.सौ.नलिनी किशोर राठी शिरपूर, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी संचालक म्हणुन चौधरी बबन रावजी शिरपूर, भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनधी संचालक म्हणुन धनगर निंबा ओंकार शिरपूर यांची शिरपुर तालुका सहकारी निवडणुक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था राजेंद्र विरकर यांनी बिनविरोध निवड दि. २७ मार्च रोजी झाल्याचे जाहिर केले असुन शिरपूर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली दि. ७ एप्रिल रोजी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. चेअरमन व व्हा. चेअरमन निवड बिनविरोध जाहिर करण्यात आले. चेअरमनपदी बबन रावजी चौधरी तर व व्हा. चेअरमनपदी मोहन दयाराम सोनवणे यांची निवड बिनविरोध झाली. माजी आमदार तथा संस्थेचे संचालक संभाजीराव पाटील यांनी चेअरमन बबन रावजी चौधरी व व्हा. चेअरमन मोहन दयाराम सोनवणे यांचा सत्कार केला तर संचालक पाटील दिपक पुरुषोत्तम, पाटील प्रविण जाधव, चौधरी प्रशांत बबनराव, पाटील अविनाश गोविंद, अग्रवाल महेशकुमार रामेश्वर, धनगर निंबा ओंकार, संचालिका डॉ.सौ.नलिनी किशोर राठी यांचाहि सत्कार करण्यात आला. शिरपूर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. संचालक मंडळचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
