June 29, 2025 3:43 pm

शिरपुरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवसी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते पक्ष ध्वजारोहण

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपुरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवसी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते पक्ष ध्वजारोहण

शिरपुर : जगातील सर्वांत मोठी संघटना असणारा पक्ष म्हणजे ‘भारतीय जनता पक्ष’. राष्ट्र प्रथम हा विचार ठेऊन विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी कार्यरत भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस. आजच्या या मंगल दिवसाचे औचित्य साधून भाजपा कार्यालय शिरपुर येथे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भाजपचा झेंडा फडकवला. भारतीय जनता पक्षातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना व समर्थकांना 45 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रभू श्रीराम यांची जयंतीनिमित्त श्रीरामाची प्रतिमा पुजन जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते तर स्व. अटलबिहारी वाजपेयी, स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपा ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस हेमंत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ऊर्जा, देशाप्रती अटूट समर्पण आणि राष्ट्रसेवेच्या निष्ठेने प्रेरित होत, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याचा दृढ संकल्प करूया. हा केवळ पक्षाचा वर्धापन दिन नाही, तर विचारधारेच्या ताकदीचा आणि राष्ट्रउभारणीसाठी घेतलेल्या निर्धाराचा पुनरुच्चार करण्याचा दिवस आहे. जनसेवा हीच आपली खरी ओळख आहे. त्यामुळेच, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी, देशाच्या आत्मनिर्भरतेला बळकट करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात ‘विकसित भारत २०४७’ च्या दिशेने वेगाने वाटचाल करण्यासाठी आपण सर्वजण झोकून देऊन काम करू. सक्षम नेतृत्व, संघटनेची मजबूत ताकद आणि कार्यकर्त्यांची निस्वार्थ निष्ठा यांमुळे भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. आपण सर्वांनी नव्या जोमाने, नव्या संकल्पाने आणि अखंड राष्ट्रभक्तीने प्रेरित होत भारताच्या विकासासाठी एकत्र येऊया. प्रगती, सुशासन आणि सबका साथ, सबका विकास या तत्त्वांवर पुढे जात, नवभारताच्या निर्मितीसाठी पूर्ण समर्पणाने कार्य करण्याचा निर्धार करूया! व भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्यात. याप्रसंगी भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, भाजपा तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनार, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष नंदु माळी, अल्पसंख्यक मोर्चा शहराध्यक्ष रफीक तेली, भटके विमुक्त आघाडी शहराध्यक्ष राजेश्वर शिवदे, बाराबलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज शिंपी, माजी नगरसेवक राजू एंजट, शिरपुर पंस. माजी सदस्य चंद्रकांत पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, उपाध्यक्ष कुणाल माळी, पप्पु राजपुत, शरीफ शेख, सतिश धाकड आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!