June 29, 2025 9:34 pm

करमाळा येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री राम मंदिर ट्रस्ट व दुर्गा वाहिनी यांच्या वतीने श्री राम नवमी निमित्त आज भव्य दिव्य मिरवणुक सोहळ्याचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री राम मंदिर ट्रस्ट व दुर्गा वाहिनी यांच्या वतीने श्री राम नवमी निमित्त भव्य दिव्य मिरवणुक सोहळ्याचे आयोजन आज सोमवार दि. ०७/०४/२०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता किल्ला वेस येथून करण्यात आले आहे. सदरच्या मिरवणुकीत SRS No.१ स्वराज यांचे पथक असून माही डोकोरेटर्स च्या वतीने आकर्षक सजावट करण्यात येणार आहे तर श्री राम समर्थ लाईट्स यांच्या कडून दिमाखदार विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.
तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल करमाळा यांच्या वतीने व विवेक कुलकर्णी बजरंग दल मुंबई क्षेत्र संयोजक नितीन महाजन बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत सयोंजक संदेश भेगडे बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसयोंजक यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील सर्वात मोठी त्रिशूल दीक्षा करमाळा प्रखंडात होणार आहे.
यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे ११०० युवक त्रिशूल दीक्षा घेणार आहेत. सदरचा कार्यक्रम हा दिनांक ०७/४/२५ रोजी दुपारी ठीक ०४ वाजता विकी मंगल कार्यालय करमाळा येथे होणार आहे.
त्यानंतर संध्याकाळी ठीक ०५ वाजता शौर्य संचलन संचलन मार्ग विकी मंगल कार्यालय-सुभाष चौक-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा-जय महाराष्ट्र चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-सुभाष चौक-जय महाराष्ट्र चौक – फुलसुंदर चौक-किल्लावेस समाप्त होणार असून संध्याकाळी ०६ वाजता महाआरती होईल व प्रभू श्रीराम यांची भव्य दिव्य शोभायात्रा निघेल शोभायात्रा मार्ग हा किल्लावेस-फुलसुंदर चौक-जय महाराष्ट्र चौक-सुभाष चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा असणार आहे.
यावेळी सर्व श्री राम भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!