June 30, 2025 1:25 am

म्हैसगाव येथील साखर कारखाना विकणाऱ्या संजयमामा शिंदे यांना आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही – सुनिल तळेकर, प्रवक्ते पाटील गट

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – म्हैसगाव येथील साखर कारखाना विकणाऱ्या संजयमामा शिंदे यांना आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असा हल्लाबोल आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आजी माजी आमदारांचे पॅनल एकमेकांच्या विरोधात लढत असुन आज पाटील गटाकडून थेट माजी आमदार संजयमामा शिंदे यांना टिकेचे लक्ष केले गेले. यावर सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की संजयमामा शिंदे यांना साखर कारखाना चालवता येत नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन‌ लि हा खाजगी साखर कारखाना संजयमामा यांना आयता मिळाला होता. यातही हा कारखाना आपणास द्या अन्यथा आपण माढा तालुक्यात विधानसभा निवडणुक लढवणार अशी इशारा कुटुंबातील सदस्यांना दिल्याने त्यांना हा कारखाना मिळाला असल्याचे बोलले जाते. वास्तविक पाहता माढा तालुक्यातील छत्तीस गावातही भरपुर ऊस उपलव्ध असतानाही व शेतकऱ्यांना गरज असताना हा कारखाना संजयमामा सक्षमपणे का चालवू शकले नाहीत हा एक संशोधनाचा विषय आहे. या कारखान्याने विविध  बँकामधून शेतकऱ्यांना विचारात न घेता काढलेली कर्जे हा तपासाचा भाग आहे. तर ज्या जवळच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या उताऱ्यावर बोजा चढवून या कारखान्यास आर्थिक मदत केली त्या सहकाऱ्यांना त्यांनी मागणी केलेल्या प्रमाणात शेअर्स का दिले गेले नाहीत हा सुद्धा विचार करायला भाग पाडणारा विषय आहे. स्वतः संजयमामा शिंदे हे या कारखान्याचे चेअरमन होते पण कोणालाही माहीत होऊ न देता आपल्या मुलाला चेअरमन करण्यामागे कोणते कारण होते ? या गोष्टीवर एक उमेदवार म्हणून आता संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील कारखाना सभासद मतदारांना सर्वकाही सांगावे. केवळ आपण कारखाना विकला आणि विरोधक आपल्यावर आरोप करतील असे सांगून विषयाला बगल‌ देऊ नये. आदिनाथच्या निवडणुकीत उतरल्यानंतर आता सभासद‌ कारखानदारीच्या अनुभवा विषयी विचारणारच आहेत. म्हैसगाव येथील कारखान्याने विविध बँकामधून शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांना माहिती होऊ न‌ देता काढलेल्या कर्ज प्रकरण घोटाळ्यात करमाळा तालुक्यातील शेतकरीही फसवले गेले आहेत.विशेष म्हणजे फसवणुक झालेले हे शेतकरी आदिनाथ कारखान्याचे सभासद मतदार सुद्धा आहेत. तालूक्याचे राजकारण करत असताना जिल्हा पातळीवरील गप्पा, जिल्ह्याच्या राजकारणात राज्यपातळीवरील विषय काढणे ही संजयमामांची जुनीच सवय आहे. त्याप्रमाणे आता निवडणुक करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याची लागली असता थेट ब्राझील व इस्राईल या देशातील कारखान्याचे विषय तालुक्यातील मतदारांसमोर मांडुन काहीही साध्य होणार नाही. निवडणुक निकालानंतर आम्ही आदिनाथ कारखान्याच्या कार्यस्थळावर “जागतिक पातळीवरील साखर कारखाने व त्यासमोरील आव्हाने” या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करु. यात आम्ही मानधन देऊन संजयमामा शिंदे यांना बोलायला निमंत्रित करु. पण सध्या मात्र त्यांनी आदिनाथ कारखान्याच्या सभासदांना आपण म्हैसगाव येथील मालकी हक्काचा कारखाना का विकला यावर‌ सविस्तर सांगावे असा मार्मिक टोला तळेकर यांनी यावेळी लगावला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!