सप्तशृंगी गड दर्शनासाठी भाविकांसाठी आनंदाची बातमी!
अमळनेर : विक्की जाधव
सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत सुखद वार्ता – अमळनेर आगारातर्फे अमळनेर ते नांदुरी गडासाठी विशेष जादा बसेसची सुविधा करण्यात आली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता ही विशेष व्यवस्था करण्यात आली असून, प्रवास अधिक सुकर आणि सोयीस्कर होणार आहे.
बस प्रस्थान स्थळ: अमळनेर बस स्थानक
प्रस्थान वेळा (सकाळी):
• 6:30 वा.
• 7:30 वा.
• 8:30 वा.
• 9:30 वा.
• 10:30 वा.
ही सेवा भाविकांसाठी एक सुवर्णसंधी असून, सर्व श्रद्धाळू भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, अमळनेर आगार यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
“एस.टी.सोबत भक्तीच्या मार्गावर एक विश्वासाचा प्रवास!”