शिरीषदादांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न – जनतेचा प्रेमळ प्रतिसाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरीषदादांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न – जनतेचा प्रेमळ प्रतिसाद..

 

अमळनेर : विक्की जाधव

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मा. शिरीषदादा चौधरी यांचा वाढदिवस दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी इंदुमाई निवास, स्टेशन रोड येथे साजरा करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता सुरू झालेला हा अभिष्टचिंतन सोहळा रात्री उशिरापर्यंत प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या वर्षावात पार पडला.

नेतृत्वाला लाभलेला जनतेचा पाठिंबा

या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादांच्या कार्यपद्धतीवर प्रेम करणाऱ्या जनतेने उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून आपले नाते दृढ केले.

बोलके भाषण, भावनांनी भरलेली उपस्थिती..

कार्यक्रमात शिरीषदादा मित्रपरिवार आघाडीचे गटनेते बबली पाठक यांनी आपल्या भाषणात म्हटले,

“मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना,

मैं समुंदर हूं, लौट कर जरूर आउंगा…”

या ओळींनी उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं.

शिरीषदादांचा आत्मीयता भरणारा संदेश

शिरीषदादांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे आभार मानताना सांगितले की, “हे प्रेमच मला पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा देतं. माझं राजकारण हे जनतेसाठी, जनतेबरोबर आहे.”

कार्यकर्त्यांनी उचलला एकजुटीचा विश्वास

वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण होतं. कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपल्याच माणसाच्या वाढदिवसाला भेट दिल्याचा आनंद व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!