June 29, 2025 7:23 pm

आहारासाठी फेस रिकग्नेशन प्रणालीची सक्ती बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन- रामकृष्ण बी.पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
आहारासाठी फेस रिकग्नेशन प्रणालीची सक्ती बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन- रामकृष्ण बी.पाटील
राज्यात प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फेस रिकग्नेशन प्रणालीमध्ये तांत्रिक दोष असूनही माहिती भरण्याची प्रचंड सक्ती केली जात असून माहिती पूर्ण न भरल्यास कारवाई करण्याच्या धमक्या सेविकांना दिल्या जात आहेत.
ही बाब संघटनेने वरिष्ठ पातळीवर निदर्शनात आणून दिली त्यावर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी राज्यातील लाभार्थ्यांना फेस रिकग्नेशन प्रणाली सध्या प्रचंड अडचणीची ठरू लागल्यामुळे FRS ची सक्ती नसल्याचे सांगितले आहे तसेच यावर तांत्रिक उपाय शोधणे सुरू असल्याचेही आयुक्त यांनी सूचित केले आहे.
अंगणवाडीतील प्रत्येक लाभार्थ्याचे अचूक नोंदणी करण्यासाठी प्रणाली वापरावी असा शासनाचा आदेश असून आयुक्तालयाकडून दिनांक २५ मार्च २०२५ रोजी पोषण ट्रॅक्टर इंडिकेटर बाबत सूचना जारी केली आहे.त्यानुसार अंगणवाडी सेविकांनी बालकांच्या पालकांचे आधार कार्ड जोडून एफ.आर.एस प्रणालीत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
परंतु राज्यात बहुसंख्य ठिकाणी लाभार्थ्यांच्या मोबाईलवर ओटीपी मिळण्यास अडचण येत आहे त्यामुळे लाभ मिळण्यापासून लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला आहे.
तसेच पालकांनी आधार कार्डवर दिलेला मोबाईल नंबर बंद असणे,तो बदललेला असणे,आधार कार्डला मोबाईल अपडेट नसणे त्यामुळे ओटीपी येण्यासाठी अडचणी येत असून जुन्याच नंबरवर ओटीपी जात असल्याने एफ.आर.एस मध्ये खात्रीपूर्वक नोंद होत नाही.
वारंवार प्रयत्न करूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रणालीचे कामकाज करण्यात अनेक अडचणी येत आहेत. म्हणून एफआरएस प्रणालीतील तांत्रिक दोष आणि अडचण दूर झाल्याशिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना FRS ची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केली आहे असे असूनही प्रकल्प कार्यालयांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना FRS ची सक्ती सुरूच ठेवल्यास सक्ती करणाऱ्या प्रकल्प कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही कार्याध्यक्ष पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!