June 29, 2025 3:05 am

सात्रीलागावात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग – तीन कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी!

अपनी भाषा में पढ़े! Translate

सात्रीलागावात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग – तीन कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी!

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील सात्रीलागावात बुधवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत तीन कुटुंबांचे संपूर्ण घरभान नष्ट झाले. शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही आग काही क्षणांतच भडकली आणि त्यात एका घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिकच भीषण झाली.

 

भयावह दृश्य – आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल!

घटनास्थळी बघणाऱ्यांची गर्दी जमली होती. जळत्या घरांच्या गर्जनेने संपूर्ण गाव हादरले. ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण आगीच्या तांडवापुढे सगळे हतबल झाले.

 

प्रशासनाचा विलंब आणि धडपड

आगीचा वणवा पसरताच उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे आणि मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी तत्काळ दोन अग्निशमन बंब रवाना केले. मात्र, गावाच्या मार्गात असलेल्या नदीमुळे अग्निशमन गाड्या काही काळ अडकल्या, परिणामी मदतीला उशीर झाला. त्यानंतर धरणगाव येथून पाण्याच्या गाड्या मागवण्यात आल्या.

 

कुटुंबे उघड्यावर – मदतीची गरज

या आगीत तीन कुटुंबांचे संपूर्ण अस्तित्व राख झालं. संसाराच्या हिशेबाने उभे केलेले घरकुल, जीवनभराची कमाई काही क्षणांत भस्मसात झाली. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!