June 28, 2025 10:09 pm

रखडलेली माळेगांव कारखान्याची निवडणूक घेण्याचे आदेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

रखडलेली माळेगांव कारखान्याची निवडणूक घेण्याचे आदेश
बारामती (सह-संपादक – संदिप आढाव)
उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका रद्द झाल्याने माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून लवकर निवडणूक घ्यावी असा आदेश प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांनी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांना पत्राद्वारे केली आहे.
माळेगाव कारखान्याची निवडणूक जाहीर करण्यात आली होती.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांची निवड करण्यात आली होती.मात्र याच कालावधीत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.
सदर याचिकेत तथ्य नसुन ती रद्दबातल करण्यात येऊन निवडणूक काळात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.सदर निर्णयामुळे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी आदेश देऊन हि निवडणूक त्वरित घ्यावी असे आदेश दिले आहेत.
दरम्यान सदर निवडणूक लवकर होणार असल्याने सत्ताधारी गट सक्रिय झाला असून गुरु शिष्य जोडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!