लोकमत परिवारातर्फे जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिरपूर येथील सीमाताई रंधे यांचा कर्तुत्वान महिला विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
शिरपूर परीट महिला मंडळाने अभिनंदन केले..
कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या शैक्षणिक व सामाजिक वारसा जोपासणाऱ्या महिला सेवा मंडळाच्या प्रदेशाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य धुळे किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालिका सौ सीमाताई रंधे यांना देण्यात आला.
सीमाताई रंधे यांचे अभिनंदन करतांना अशोकदादा बेडीस्कर व सविताताई बेडीस्कर..
यावेळी आमदार सुरेश गोळे,धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषारजी रंधे, अभिनेत्री मीरा, जळगाव जिल्हा परिषद सि. इ.ओ मीनल अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, गोदावरी फाउंडेशनच्या केतकी पाटील, सातपुडा ऑटोमोबाईल्स संचालक किरण बच्छाव, कलाबाई शिरसाळे, परीट सेवा मंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री अरुण दादा शिरसाळे,श्री पंकज भाऊ शिरसाळे, प्राध्यापक राजेश जाधव,मधुर रंधे,गौरी रंधे आदी उपस्थित होते.
सीमाताई रंधे यांचे अभिनंदन करतांना सुनील सूर्यवंशी व दिपाली सूर्यवंशी…
सौ. सीमाताई रंधे यांना हा पुरस्कार मिळाले आमदार अमरीश भाई पटेल, काशीराम दादा पावरा,भूपेश भाई पटेल, धोबी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णाजी कनोजिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री एकनाथराव बोरसे, परीट सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग आदींनी अभिनंदन केले…