शिरपुर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे थोर महापुरुष, आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंती निमित्त शिरपुरात भाजपा तर्फे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले. दि. 30 मार्च रोजी सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांना जयंती निमित्त धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांच्या जयंती (तिथिनुसार) विचार व्यक्त करतांना सांगितले की, स्व. हेडगेवारांनी 1925 मध्ये रा.स्व. संघाच्या रुपात राष्ट्रसेवेची मुहुर्तमेढ रोवली. आज त्याचा देशाला सावली देणारा 100 वर्षांचा वटवृक्ष झाला. अगणित देशभक्त घडले आहेत. या वटवृक्षाचे बीज भारताच्या मातीत रुजविण्याचे काम त्यांनी केले आहे. डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित कार्यकर्त्यांची फौज घडवली. त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रभक्ती, त्याग आणि समाज हितासाठी समर्पित होते. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत आपण भारताला अधिक शक्तिशाली आणि आत्मनिर्भर बनवूया असे सांगितले.
याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपुर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील, व्यापारी आघाडी मा. जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनार, भाजपा शहर उपाध्यक्ष नरेश पवार, शहर चिटणीस राधेश्याम भोई, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रकाश गुरव, हिंगोणी सरपंच सोमा भिल, जिल्हा कार्यकारणी सदस्य योगीराज शिंपी, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप राजपुत, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अनिल बोरसे, भटके विमुक्त आघाडी शहराध्यक्ष राजेश्वर शिवदे, उद्योग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र राजपुत, पप्पु राजपुत, नंदु माळी, सतीष धाकड, शिरपुर खान्देश तेली समाज मंडळ पदाधिकारी राकेश चौधरी, दिनेश चौधरी, किशोर चौधरी, अभय गौड, मेहुल धाकड, हरीषदास सारसर, बिरजु सारसर, विक्रम सारसर, सागर सारसर आदि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.