June 28, 2025 5:20 pm

नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन –क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

अपनी भाषा में पढ़े! Translate

नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन –क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

(निलेश गायकवाड)

आज धुलीवंदन निमित्त तळजाई टेकडी येथे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भीमराव तापकीर यांनी सहकाऱ्यांसह रंगांच्या सणाचा आनंद घेतला. यावेळी खेळताना उपस्थितांनी कोरड्या रंगांचा वापर करण्याचे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

यावेळी उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन धुळवड खेळला आणि या सणाच्या आनंदात रंगबेरंगी वातावरण निर्माण केले. ‘आनंदाने होळी खेळा, पण पर्यावरणाचा विचार करा’ असे आवाहन करत सर्वांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी स्थानिक सहकार्याच्या मदतीने एकत्रित येत सण साजरा करण्यात आले होते, आणि सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची महत्त्वाची भूमिका ठरली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!