June 28, 2025 10:28 pm

सिडकोतील खून: जुन्या भांडणामुळे तरुणावर कोयत्याने हल्ला…

अपनी भाषा में पढ़े! Translate

सिडकोतील खून: जुन्या भांडणामुळे तरुणावर कोयत्याने हल्ला…

नाशिक : होळीच्या दिवशी सिडकोच्या शुभम पार्क परिसरात जुन्या भांडणामुळे तीन ते चार गुंडांनी धारदार कोयत्याचा उपयोग करून २२ वर्षीय तरुण सुमित सुरेश देवरे याचा क्रूर खून केला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जोसेफ चर्चसमोर घडली.

सुमित देवरे (वय २२, रा.महाजननगर, सिडको )येथील रहिवासी होता व सटाणा येथे शिक्षण घेत होता. त्याच्या मागे आई-वडील आणि एक बहीण आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या भयानक घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेच्या ठिकाणी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी तात्काळ दाखल झाले. संशयितांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.

घटनेची सविस्तर माहिती अशी, की गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास शुभम पार्क येथे जोसेफ चर्चसमोर सुमितवर हल्ला झाला. हल्लेखोरांनी धारदार चॉपरचा वापर करून त्याच्या पोटावर आणि अंगावर सपास वार केले. या गंभीर हल्ल्यात सुमित याच्या पोटातील आतडे बाहेर आले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव, सहाय्यक निरीक्षक शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी घटनेच्या तपासासाठी तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे. अंबड पोलिस ठाण्यात खूनाच्या गुन्ह्यासाठी रात्रभर प्रक्रिया सुरू होती आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!