June 28, 2025 10:37 pm

टाकरखेडा येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख व मुद्देमाल हस्तगत

अपनी भाषा में पढ़े! Translate

टाकरखेडा येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख व मुद्देमाल हस्तगत

 

अमळनेर: विक्की जाधव

तालुक्यातील टाकरखेडा येथे सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर अमळनेर पोलिसांनी केलेल्या छाप्यात १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख रक्कम आणि ५ मोटरसायकली, एक रिक्षा यांसह ३ लाख ४६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात धरणगाव व अमळनेर तालुक्यातील ९ आरोपींविरुद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभारी अधिकारी केदार बारबोले यांना टाकरखेडा येथे मोठा पत्त्यांचा जुगार सुरू आहे, अशी माहिती मिळाल्यानंत रसमाधान धर्मा पाटील यांच्या गट नंबर १८० मधील शेतशिवारात या जुगारा खेळताना उघडकीस आले. पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर प्रकाश भगवान महाजन (माळीवाडा, धरणगाव), भाईदास सोनू अहिरे (लोणे, अमळनेर), रमेश आत्माराम महाजन (हनुमान नगर, धरणगाव), बापू जगन्नाथ पाटील (शिवाजीनगर, पैलाड), समाधान धर्मा पाटील, शिवलाल धर्मा पाटील (दोन्ही टाकरखेडा), विजय पंढरीनाथ सोनवणे (निशाणे, ता. धरणगाव), शिवदास प्रकाश धनगर (नेहरूनगर, धरणगाव)  येथील अन्य आरोपींसह काही लोकांना ताब्यात घेतले.

या कार्यवाहीत जप्त केलेल्या मुद्देमालात १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख रक्कम, ५ मोटरसायकली (किंमत २ लाख २० हजार रुपये) आणि १ रिक्षा समाविष्ट आहे.

ही कार्यवाही अनेक वर्षांनंतर झालेल्या मोठ्या प्रमाणात जुगार अड्ड्यावर धाड असल्याने विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. या गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!