अमळनेरच्या विवेकानंद बडगुजरची जिल्हास्तरीय पंजा लढवण्याच्या स्पर्धेत भव्य कामगिरी – विभागीय स्तरावर पटकावला प्रथम क्रमांक
अमळनेर : विक्की जाधव..
संत सखाराम महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर येथील इलेक्ट्रिशियन विभागातील विद्यार्थी विवेकानंद महेंद्र बडगुजर याने जळगाव येथे ५ मार्च २०२५ रोजी झालेल्या “महाकुंभ क्रीडा स्पर्धा” मध्ये पंजा लढवण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या अद्वितीय यशामुळे त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पत्रकार कुटुंबातील खेळाडूची मोठी झेप
विवेकानंद बडगुजर हा अमळनेरमधील ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ बडगुजर यांचा नातू आहे, तसेच अटकाव न्यूजचे संपादक हितेंद्र बडगुजर यांचा पुतण्या आहे. त्याच्या या विजयामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले असून, संस्थेतील शिक्षक, प्रशिक्षक आणि विद्यार्थी या यशामुळे प्रेरित झाले आहेत.
संस्थेच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा
संत सखाराम महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या मुल्यवान मार्गदर्शनामुळे विवेकानंदने ही यशस्वी कामगिरी साधली. त्याच्या यशाचे श्रेय प्राचार्य ए.बी. देव, गटनिर्देशक श्री. वी.पी. वाणी, निदेशक श्री. ए. डब्ल्यू. दुसाने, तसेच सौ. बिराडे, सौ. इंगळे, निकम मॅडम आणि इतर शिक्षकांना दिले आहे.
पारंपरिक खेळांना मिळतोय नवा बळ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त “खेलो भारत, खेलेगा युवा, जितेगा भारत” या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय महाकुंभ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पंजा लढविणे, दंड बैठक, पावनखिंड दौड, लेझीम, लगोरी, कबड्डी, लंगडी, रस्सीखेच, फुगडी, विटी-दांडू आणि खो-खो यांसारख्या पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला होता.
उद्घाटन..
या स्पर्धेचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. मंत्री मंगल प्रभात लोढा (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता) यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
विजयी खेळाडूंना सन्मान..
स्पर्धेतील विजयी खेळाडूंना प्रमाणपत्रांसह आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. विवेकानंद बडगुजरच्या या यशामुळे त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.