बहारदार रंगांचा तिलकोत्सव: संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण तरुणींना होळीचे निमंत्रण.
मार्मिक न्यूज नेटवर्क: विक्की जाधव.
बालग्राम परिवारातर्फे प्रतिवर्ष प्रमाणे, या वर्षी देखील १३ व १४ मार्च २०२५ रोजी दोन दिवसीय “रंग दे बसंती” रंगारंग (Colourful), बहारदार अशा रंगांचा उत्सव (आनंदनगरी व तिलकोत्सव) साजरा करण्यात येत आहे.
मनुष्याच्या जीवनात अनेक गोष्टींचे महत्त्व आहे. यामध्ये काही प्रसंग, घटना अशी असतात, ज्यामुळे मनुष्याला जगण्यासाठी नवी दिशा आणि नाविन्यता मिळते. भारतीय संस्कृतीने दिलेल्या संस्कारांच्या रंगांनी आपल्याला जीवनात जिवंत ठेवले आहे.
एकत्र आलेल्या या सणोत्सवात रंगोत्सव (रंगपंचमी) असे एक महत्वाचे स्थान आहे. आपण आपल्या घरी, गल्लीत, रस्त्यावर, वसाहतीत हा सण साजरा करत असाल; पण या वेळी आपल्या बालग्राम परिवारात सहभागी होऊन अनुभव घ्या. हा सण आपणास द्विगुणीत आनंदाचे अनुभव प्रदान करेल, हे नक्की.
उत्सवाचे वैशिष्ट्ये:
– आनंदनगरीत होलिकापूजन
– गप्पांची मैफल
– कविता, नृत्य, गाणे
– वैयक्तिक कौशल्य प्रदर्शन
– पूल पार्टी इत्यादी!
नोंदणीसाठी लिंक:
[नोंदणी करा](https://forms.gle/Y2ztbpwVNvzZEx1x9)
ठिकाण: बालग्राम परिवार, गेवराई, जि. बीड
या विशेष उत्सवात आपण सस्नेह निमंत्रित आहात. एकत्र येऊन उत्सव रंगांचा, प्रेमाचा, आपुलकीचा आणि संस्कृतीचा आनंद लुटा.
सोशल मीडिया वर आमच्या यशस्वी प्रवासाचा एक भाग व्हा:
– Facebook: [बालग्राम परिवार](https://www.facebook.com/balgrampariwar?mibextid=ZbWKwL)
– Instagram: [balgrampariwar](https://www.instagram.com/balgrampariwar?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==)
– YouTube: [बालग्राम](https://youtu.be/-3U6ijtFiec?si=wC1zpxF6SAy0YjLQ)
– Website: [AAI Foundation](https://aaifoundation.org/)
या उत्सवाच्या माध्यमातून आपणा सर्वांना एकत्र येण्याची आणि आनंद व्यक्त करण्याची संधी मिळेल. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना होळीच्या शुभेच्छा!