दौंड येथे बिहार प्रशासनाचा बहुजन समाज पार्टी दौंड यांचेकडून जाहीर निषेध!

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड येथे बिहार प्रशासनाचा बहुजन समाज पार्टी दौंड यांचेकडून जाहीर निषेध!
महाबोधी बुध्दविहार, बुध्दगया, बिहार बौध्द भिक्खूंच्या ताब्यात मिळणेसाठी समर्थन.


प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड –
महाबोधी बुध्दविहार, बुध्दगया, बिहार येथे संवैधानिक मार्गाने सुरु असलेले बौध्द भिक्खूंचे व बौध्द उपासक उपासिकांचे आंदोलन बिहार प्रशासनाने बेकायदेशीररित्या बंद केल्यामुळे बिहार पोलीस प्रशासनाचा जाहिर निषेध करण्यात आला व महाबोधी बुध्दविहार, (बुध्दगया) बौध्द भिक्खूंच्या ताब्यात मिळणेसाठी समर्थन केले.
बहुजन समाज पार्टी दौंड विधानसभेच्या वतीने विनंती निवेदन दौंड तहसीलदार यांना देण्यात आले की, महाबोधी बुध्द विहार, बुध्दगया, बिहार हे सनातनी ब्राह्मण महंतांच्या अधिपत्याखाली आहे, ही बाब भारतीय संविधानाच्या दृष्टीने फार चुकीची आहे, त्यामुळे बौध्द भिक्खु सदरचे विहार सनातनी महंतांच्या ताब्यातून बौध्द भिक्खूंच्या ताब्यात मिळणेसाठी संवैधानिक मार्गाने आमरण उपोषणास बसले होते, त्यांना बिहार सरकारच्या गया येथील पोलीस प्रशासनाने रात्रीच्या अंधारात कारवाई करत बेकायदेशीर पध्दतीने सदरचे आंदोलन दडपण्यात आले आहे. त्यामुळे बिहार पोलीस प्रशासनाचा जाहिर निषेध करत आहोत. तसेच महाबोधी बुध्द विहार, बुध्दगया हे बौध्द भिक्खूंच्या ताब्यात देण्यासाठी बिहार सरकारने व गया येथील जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन जगभरातील बौध्द बांधवांना न्याय द्यावा, या वेळी निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे श्रीकांत आनंद सोनवणे अध्यक्ष बहुजन समाज पार्टी दौंड , सुनील शिंदे, अभिजीत डेंगळे, अक्षय शिंदे, श्रीकांत माने, दिपक धनवे, अजिंक्य सोनवणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!