जालना जिल्ह्यातील घटनेतील आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करावी….
बारामतीत धनगर समाजाचे प्रांतधिकाऱ्यांना निवेदन
बारामती (सह- संपादक – संदिप आढाव)
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील कैलास बोराडे या तरुणास महादेव मंदिरात दर्शनासाठी का गेला या वादातून जानेफळ (गायकवाड) येथील गावगुंडाने लोखंडी रॉडला चुलीवर तापवून अंगाला चटके देत अतिशय अमानुष पद्धतीने जीवघेणा हल्ला केला.
अशा अमानवीय कृत्याबद्दल या गावगुंडांवर कठोर मोका अर्तगत कारवाई होवून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कैलास बोराडे यांच्या
अंगावर भयानक जखमांचे हिडिओ मोबाईलवर व्हायरल झाले आहेत
सदर प्रकरणाची मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने दखल घेत दोषींवर मोका लावून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बारामती तालुका सकल धनगर, ओबीसी समाजाच्या वतीने आज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष, बापूराव सोलनकर, रासपचे तालुका अध्यक्ष, ऍड अमोल सातकर, संपतराव टकले, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव धवडे, आर. आर मारकड, वसंतराव घुले, गोरख रुपणावर इत्यादी उपस्थित होते.