पालिकेने 2% तुघलकी कर माघे घ्यावा: शिरीष दादा मित्र परिवार
अमळनेर: विक्की जाधव.
अमळनेर नगरपरिषदेने पाणीपट्टीवर दोन टक्के व्याज वसूल करण्याच्या तुघलकी पद्धतीचा वापर करत असल्याने, सदर वसुलीविरोधात आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. गेल्या वर्षी देखील या वसुलीच्या विरुद्ध आवाज उठवण्यात आला होता, आणि त्यावेळी याची वसुली स्थगित केली गेली होती. परंतु पुन्हा नगरपरिषदेस अती व्याज वसूल करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांत असंतोष वाढला आहे.
मित्र परिवार आघाडीने म्हटले आहे की, “याबाबत जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्ये अशी वसुली करण्यात येत नाही, फक्त अमळनेर नगर परिषदेतच असे होते.” याबरोबरच, अनेक वर्षांपासून लोकवर्गणीच्या नावाने शहरातील नागरिकांची लुट सुरू करण्यात आली आहे.
आज, 3 मार्च 2025 रोजी, आमदार श्री. शिरीष चौधरी आणि मित्र परिवार आघाडीने गांधीगिरीच्या माध्यमातून प्रतीकात्मक आंदोलन केले. जनावरांना कापण्याच्या प्रतिकात्मक सुरा भेट देत, लोकवर्गणी व २% व्याज वसुली बंद करण्याची मागणी करत, त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. “जर प्रशासनाने तात्काळ याबाबत निर्णय घेतला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी ठेवली आहे,” असा इशारा दिला आहे.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी या संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
या आंदोलनात मित्र परिवारातील नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती, ज्यामध्ये गटनेते प्रवीण कुमार पाठक, प्रतोद सलीम भाई टोपी, माजी नगरसेवक गुलाब बापू पाटील, भाऊसाहेब महाजन, धनंजय महाजन, अनिल महाजन, संतोष लोहेरे, दीपक चौगुले, पंकज चौधरी, शुभम यादव, राहुल कंजर, किरण बागुल, कुणाल साळी, नवीद शेख यांचा समावेश होता.
गांधीगिरी आंदोलनामुळे प्रशासनाने थोडीशी तारांबळ उडवली होती, आणि या आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र रंगली होती.