June 29, 2025 3:18 am

शासनाच्या काॅपीमुक्त अभियानात सर्वांनी आपापली जबाबदारी…मुख्याध्यापक प्रल्हाद सोनार

अपनी भाषा में पढ़े! Translate

शासनाच्या काॅपीमुक्त अभियानात सर्वांनी आपापली जबाबदारी…मुख्याध्यापक प्रल्हाद सोनार

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) विद्यार्थी उद्याचे भविष्य असून उज्वल भारत निर्मितीसाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे जगले पाहिजे त्याच बरोबर शासनाच्या काॅपीमुक्त अभियानात सर्वांनी आपापली जबाबदारी पार पाडून अभियान यशस्वी होण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे असा संदेश मुख्याध्यापक प्रल्हाद सोनार यांनी रोहिणी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णाकुंभार माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभात बोलत होते.
रोहिणी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णाकुंभार माध्यमिक विद्यालयातील सन्-२०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. डी. सोनार हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षीका श्रीमती वर्षा पाटील,रत्नाकर सुर्यवंशी, विजय बागुल,वरिष्ठ लिपिक अंबादास सगरे, राकेश डुडवे,भुषण भोई, संजय वाघ, गणपत शिरसाठ, संजय तिरमले आदी उपस्थित होते.
या प्रसंगी विजय बागुल व अंबादास सगरे यांनी दहावीच्या परीक्षे संदर्भात व महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ नाशिक यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहून अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास होऊन शाळेचे व आई वडिलांचे नाव लौकिक करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी दहावीच्या मयुर भील, महेंद्र भील, जयश्री बंजारा, नम्रता बंजारा,दिव्या सोनवणे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात आदिवासी भागातील आदर्श शाळा म्हणून आमची रोहिणीची शाळा आहे. या शाळेत विविध उपक्रमामुळे आज आम्ही शिक्षणाच चांगला दर्जा आम्हाला मिळाला आहे. यामुळे भविष्यात आम्ही उंच भरारी घेऊन शाळेचे व आई वडिलांचे नाव लौकिक करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
या प्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.तर सूत्रसंचालन महेंद्र भील तर आभारप्रदर्शन मयुर भील यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!