मामा मंत्री झालेत आता भिगवण चे बसस्थानक बारामती सारखे जरी नाही झाले तरी डागडुजी नक्की होईल ना..?
(निलेश गायकवाड)
भिगवन हे गाव इंदापूरचे नाक म्हणून ओळखले जाते . भिगवन ची वाटचाल शहरीकरणाकडे वाढू लागली आहे. भिगवन या ठिकाणी वर्दळीचे ठिकाण तसेच सर्वसामान्यांना ये जा करण्यासाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध होतील असे हे गाव. या गावात रोजची कमीत कमी हजारोंच्या पटीने नागरिकांची ये जा होत असते. वर्षानुवर्ष रखडलेला बस स्थानक आता शेवटच्या घटका मोजत आहेत. या बस स्थानकाची अवस्था पावसाळ्यात संपूर्ण चिखलमय झालेली असते . बस स्थानकात का मध्ये प्रवाशांना उभे राहण्यासाठी निवारा म्हणून बस स्थानकाचे शेड मोडकळीस आले आहे. याकडे प्रशासन व शासन कोणत्याही प्रकारे लक्ष देण्यास टाळा टाळ करत असल्याचे दिसत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माजी मंत्री व विद्यमान मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभा घेताना भिगवणकरांना आश्वासन देण्यात आले होते मी सर्वात पहिल्यांदा भिगवन चे बस स्थानक सुधारण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करेल. आज आपण पाहतोय मंत्री महोदय दत्तात्रय भरणे या मोडकळीस आलेल्या बस स्थानकाकडे नक्कीच लक्ष देतील . बारामती सारखे जरी बस स्थानक नाही झाले तरी डाग डुजी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा सर्वसामान्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे भिगवण येथील प्रवासी नागरिकांना या ठिकाणी मोकळा श्वास घेता येईल. गुदमरलेला श्वास भरणे मामा नक्कीच मोकळा करून देतील. भिगवण येथील राजकीय समाजसेवकांनी या आपल्या भिगवण बस स्थानकाची झालेली अवस्थेसाठी नक्कीच पुढाकार घेतील.