भिगवन येथे 233 रुग्णांचे मोफत कर्करोग तपासणी शिबिर…
(निलेश गायकवाड)
राज्यात सुरू असलेल्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमे अंतर्गत भिगवन येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन मार्फत भिगवन व भिगवन परिसरातील 233 रुग्णांची तपासणी करण्यात आली…. माननीय आरोग्य मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संकल्पनेतून सदर शिबिर पार पडत आहेत… वास्तविक सदर अभियान महिला आरोग्य व कर्करोग निदान साठी राबवत येत आहे… यावेळी तालुका गटविकास अधिकारी श्री सचिन खुडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पोळ मॅडम तसेच भिगवन ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सचिन विभुते, डॉ अनिकेत लोखंडे यांनी शिबिराठी मार्गदर्शन केले…
सदर कर्करोग निदान शिबिरामध्ये तोंडातील कॅन्सर व स्तन कॅन्सर ,गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर म्हणजेच सर्विक्स कॅन्सरच्या तपासणी पार पडल्या… यासाठी स्त्री रोग तज्ञ डॉ अमोल खानावरे यांनी सर्व महिलांची व दंत रोग तज्ञ डॉ घोगरे यांनी सर्व रुग्णांची तपासणी करून घेतली… यामध्ये प्रामुख्याने तोंडातील कर्करोग म्हणजेच तीन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस तोंड येणे किंवा जिभेवर जखम राहणे,अन्न गिळताना सतत होणारा त्रास,अधिक काळाचा खोकला तसेच तोंडातील जखम याबरोबरच स्त्रियांमधील गर्भपिशवीच्या तोंडाला जखम, मासिक पाळीव्यतिरिक्त होणारा रक्तस्त्राव किंवा सतत अंगावर पांढरे जाणे,लघवीमधून होणारा रक्तस्त्राव, याबरोबरच स्तनांच्या कर्करोगासाठी म्हणजेच स्तनांमध्ये गाठी असणे किंवा पुरळ,चट्टे किंवा स्तनामधून कोणत्याही प्रकारचा स्त्राव होणे, सतत दुखत राहणे असे रुग्ण तपासणी करण्यात आले… यामध्ये गर्भाशयाच्या मुखाजवळील 2 तसेच स्तनातील गाठीसाठी 4 व मुख कॅन्सरचे 2 रुग्ण हे बारामती मेडिकल कॉलेजला पुढील तपासणी व उपचारासाठी पाठवण्यात आले… सदर शिबिराचे नियोजन हे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर हॉस्पिटल मधील डॉ दिवेकर मॅडम व सर्व स्टाफ तसेच शेटफळकडे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील ,आरोग्य सहाय्यक सोलवणकर तसेच सर्व समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सहाय्यक तसेच आरोग्य सेवक, आरोग्यसेविका व सर्व गटप्रवर्तक आशा स्टाफ उपस्थित होता…. भिगवन ग्रामपंचायतचे सरपंच तसेच सर्व मेंबर व गावातील स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी शिबिरास्थळी भेट देऊन स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले…