June 28, 2025 9:35 am

महाराष्ट्रातील कुंचीकोरवे समाजाचा पहिलाच सरपंच होण्याचा मान भिगवण येथील गुरप्पा पवार यांना मिळाला !

अपनी भाषा में पढ़े! Translate

महाराष्ट्रातील कुंचीकोरवे समाजाचा पहिलाच सरपंच होण्याचा मान भिगवण येथील गुरप्पा पवार यांना मिळाला !

(निलेश गायकवाड)

इंदापूर तालुक्याचे राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवन ग्रामपंचायत मध्ये कोणची कोरवे समाजाचा महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मान गुरप्पा पवार यांनी मिळवला आहे. यामध्ये असे भिगवन ग्रामपंचायत सरपंच सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते त्याची निवडणूक दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली. यामध्ये गुप्त पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत गुराप्पा गंगाराम पवार यांना 12 तर श्रीमती निर्मला हरिश्चंद्र पांढरे यांना पाच मते मिळाली. निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक कोकरे तसेच तलाठी राहुल देवकर आणि ग्रामपंचायती अधिकारी भगीरथ परदेशी यांनी कामकाज पाहिले.

वास्तविकता पाहायला गेलं तर भिगवण येते नवनियुक्त सरपंच गुराप्पा पवार हे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील व कोणताही राजकीय वारसा नसताना देखील त्यांना सरपंच पद मिळाले याचे सर्वसामान्यातून कौतुक केले जात आहे. स्वर्गीय रमेश(बाप्पू)जाधव यांच्या समवेत पवार यांनी काम होते . त्यांच्याबरोबर राजकीय सामाजिक परिस्थितीची जाणीव पवार यांना असल्याचे बोलले जात आहे. आज त्याच एकनिष्ठतेचे फळ मिळाले असे म्हणावे लागेल. गुरप्पा पवार हे सर्वसामान्यांना मिसळून घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व आहे. गुराप्पा पवार यांनी बोलताना सांगितले मी सदैव भिगवनकरांच्या सेवेमध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करणार व गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!