March 28, 2025 10:36 am

चोरट्यांची नवी शक्कल : बनावट चावीने चोरले वाहन !

अपनी भाषा में पढ़े! Translate

चोरट्यांची नवी शक्कल : बनावट चावीने चोरले वाहन !

जळगाव :तालुक्यातील कुसुंबा येथून मालवाहू वाहन चोरी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी असरार शेख मुक्तार शेख (२५) व मुश्ताक हसन सय्यद (४२, दोन्ही रा. मास्टर कॉलनी) यांना मास्टर कॉलनीतून अटक केली. यातील मुश्ताक सय्यद हा नेहमी हे वाहन भाडे तत्त्वावर घेत होता व त्यानेच बनावट चावी तयार करून वाहन चोरल्याचे तपासात समोर आले.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कुसुंबा येथील स्वप्नील गोविंदा राठोड यांचे नऊ लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन (एमएच १९, सीएक्स ०३९०) घरासमोरून चोरट्यांनी लांबविले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरट्यांनी मास्क लावून बनावट चावीने वाहनाचे लॉक उघडल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलिस नाईक किशोर पाटील, पोकॉ योगेश घुगे, सिद्धेश्वर डापकर, नितीन ठाकूर यांनी असरार शेख मुक्तार शेख (२५) आणि मुश्ताक हसन सय्यद (४२), दोन्ही रा. मास्टर कॉलनी यांना अटक केली.
चोरी करणारा मुश्ताक सय्यद हा वाहन मालक स्वप्नील राठोड यांच्याकडून नेहमी वाहन भाड्याने घेत होता मुश्ताक सय्यद याने बनावट चावी तयार करून मित्र असरार शेख याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

जळगावातील व्यापाऱ्यांची ५ लाखात फसवणूक !

जळगाव : पोलन पेठमधून हार्डवेअर साहित्याची खरेदी करून मालाची पूर्ण रक्कम न देता मनोज विष्णू रडे यांची कर्नाटकातील लक्ष्मण शिवाप्पा असंगी या व्यापाऱ्याने पाच लाख ५६ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. याप्रकरणी बुधवारी (१२ फेब्रुवारी) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मनोज रडे यांचे पोलन पेठमध्ये प्रभात हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल जनरल प्रा. लि. नावाचे दुकान आहे. जानेवारी २०२३मध्ये लक्ष्मण असंगी नामक व्यक्ती आला व त्याने कर्नाटकातील बागलकोट येथे रामदास सिस्टीम इरिगेशन नावाचे दुकान असल्याचे सांगत रडे यांना सहा लाख ९५ हजार २५१ रुपये किमतीच्या मालाची ऑर्डर दिली. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी रडे यांनी माल कर्नाटकात पाठविला.
असंगीकडे पैशांचा तगादा लावल्यानंतर त्याने काही रक्कम दिली. नंतर पाच लाख ५६ हजार रुपयांचा धनादेश पाठविला. मात्र, तो एररमुळे वटला नाही. पैशांचा तगादा वाढल्यानंतर समोरील व्यापाऱ्याने मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रडे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून लक्ष्मण शिवाप्पा असंगी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही जळगावातील काहींची याच पद्धतीने फसवणूक झाली होती. आता पोलन पेठमधील व्यापाऱ्याची रक्कम अडकली.

२८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : घरी एकटाच असलेल्या ज्ञानेश्वर कडू साळुंखे (२८, रामेश्वर कॉलनी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी रामेश्वर कॉलनीत कॉलनीत घडली. गळफास घेण्यापूर्वी तरुणाने त्याच्या मित्राला कॉल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, एका रुग्णालयात कामाला असलेला ज्ञानेश्वर साळुंखे हा रामेश्वर कॉलनीमध्ये आई-वडिलांसह राहत होता. आई आशासेविका असून, वडील हमाली काम करतात. बुधवारी ते कामाला निघून गेल्याने ज्ञानेश्वर हा घरी एकटाच होता. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याने मित्र शुभम रंगारी याला कॉल करून तू कुठे आहेस, अशी विचारणा केली होती. नंतर शुभम हा त्याच्या घरी गेला. त्यावेळी ज्ञानेश्वर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. रुग्णालयात त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.

दुर्देवी ; कबड्डी खेळाडू विवाहितेचा शॉक लागून मृत्यू !

अमळनेर:  १३ फेब्रुवारी २०२५ अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील विनोद सुरेश पाटील हे उत्कृष्ट कबड्डी खेळाडू. अनेक ठिकाणी स्पधांना त्यांचे येणे, जाणे होते. यातच त्यांची कारले येथील पूनम यांच्याशी ओळख झाली. दोघेही राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू असल्याने दोघांचे विचारांचे सुत जुळले. त्यानंतर मैत्री झाली अन् मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तर सन २०१७ मध्ये दोघांनी जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका, वचन घेत दोघेही विवाहाच्या बंधनात रुपांतरीत झाले.
विनोद पाटील हे शेती करूनही त्यांचा संसार सुखाने चालू होता. दरम्यान, पूनम विनोद पाटील (वय २७) या सायंकाळी नळाला पाणी आले म्हणून वीज पंप लावून पाणी भरत होत्या. तर त्यांचे पती विनोद सुरेश पाटील हे घरातील माठात पाणी भरत होते. अचानक काही तरी पडल्याचा आवाज आला म्हणून पती विनोद पाटील पळतच बाहेर आले. तेव्हा त्यांना त्यांची पत्नी पूनम खाली बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. तसेच त्यांच्या हातात विजेची पिन होती. त्यानंतर त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. तर लग्नाच्या ८ वर्षांनी दोघांचा डाव अर्ध्यावरती मोडला गेला. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या प्रेम सप्ताहातील ‘वचन दिवशी’ प्रेमी युगुलाच्या वचनांचा भंग झाला. नियतीने पूनमला विनोदपासून हिरावून नेले. या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर विनोद पाटील यांच्या माहितीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करत आहेत.

जिल्ह्यातील महिला सरपंचाल लाच भोवली : पतीसह मुलाला लाच घेतांना अटक

पारोळा: व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी ३ लाखांचा धनादेशाच्या मोबदल्यात ४० हजारांची लाच घेतांना पारोळा तालुक्यातील मेहू येथील सरपंच जिजाबाई गणेश पाटील (वय ४३) त्यांचे पती गणेश सुपडू पाटील (वय ५५) व मुलगा शुभम गणेश पाटील (देवरे) (वय २६, सर्व रा. मेहू, ता. पारोळा) याच्यासह खासगी सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील (वय ३५, रा. बोदडे, ता. पारोळा) यांना पकडले. ही कारवाई दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार हे सन २०१७-१८ ते २०२२- २३ दरम्यान, पारोळा तालुक्यातील मेहू गावाचे सरपंच होते. त्यांनी गावात व्यायाम शाळा बांधण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत सात लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर व्यायाम शाळा बांधण्याचे कंत्राट कंपनीला दिले होते. त्यानंतर सन २०२३ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून जिजाबाई गणेश पाटील यांची निवड झाली होती. तत्कालीन सरपंचांनी सात लाख रुपयांपैकी चार लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला होता. उर्वरित तीन लाख रुपयांचा निधी देण्यासाठी सरपंचांनी कंत्राटदाराकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोकॉ राकेश दुसाने आणि पोकों अमोल सुर्यवंशी या पथकाने सापळा रचून सरपंच जिजाबाई गणेश पाटील, तिचा पती गणेश सुपडू पाटील, मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील यांना लाच घेताना पकडले. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांच्या पती गणेश सुपडू पाटील यांनी या रकमेची तडजोड करून ती ४० हजार रुपयांवर आणली. त्यानंतर सरपंचांच्या मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील याला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले. समाधान पाटील यांनी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

मित्राला फोन केला अन नंतर तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : आई-वडील कामाला गेलेले असताना घरी एकटाच असलेल्या ज्ञानेश्वर कडू साळुंखे (वय २८, रामेश्वर कॉलनी) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी रामेश्वर कॉलनीत कॉलनीत घडली. आत्महत्येपूर्वी ज्ञानेश्वरने आपल्या मित्राला कॉल करून तो कोठे आहे, अशी विचारणा केली आणि त्यानंतर आपली जीवनयात्रा संपविली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका रुग्णालयात कामाला असलेला ज्ञानेश्वर साळुंखे हा रामेश्वर कॉलनीमध्ये आई-वडीलांसह राहत होता. आई आशासेविका असून वडील हमाली काम करतात. नेहमीप्रमाणे ते दाम्पत्य बुधवारी कामाला निघून गेल्याने ज्ञानेश्वर हा घरी एकटाच होता. यावेळी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याने मित्र शुभम रंगारी याला कॉल करून तू कुठे आहेस अशी विचारणा केली होती. नंतर शुभम हा त्याच्या घरी गेला त्या वेळी ज्ञानेश्वर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
मित्र गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच शुभमला धक्का बसला. त्याने घराबाहेर येवून शेजारच्यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!