रोटरी ने तब्बल 700 गरजू विध्यार्थ्यांना 6 हजार रु. स्लीपिंग किट भिगवण येथे केले वाटप;कॅनडा चे प्रमुख पाहुणे
(निलेश गायकवाड)
बुधवार दि 12-2-2025 रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट रोटरी क्लब ऑफ़ भिगवण व स्लिपींग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड ( SCAW of Canada ) या स्वयंसेवी संस्थांमार्फत इंदापुर तालुक्यातील जि प शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इ १ते ४ वर्गातील एकूण 700 गरजू विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी सुमारे ६ हजार रुपये बाजार मूल्याचे स्लीपींग व स्कूल कीट चे वाटप जी प शाळा भिगवण , ता इदापुर येथे करण्यात आले .
सुमारे 22 शाळांमधील सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यासाठी कॅनडा येथील स्कॉ (SCAW) टीमचे ४ सदस्य तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंटचे व रोटरी क्लब ऑफ भिगवण चे सदस्य यांचे उपस्थितीत व शुभहस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले .रोटरी क्लब भिगवण अध्यक्ष संतोष सवाने बोलताना म्हणाले की
शालेय विद्यार्थ्यांची झोप आनंददायी व्हावी व त्यायोगे त्यांचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी चटई , सतरंजी , बेडशीट , उशी , उशीकव्हर , सोलापूरी चादर , रग , पोलर ब्लँकेट , मच्छरदाणी, शूज -सॉक्स , स्वेटर ( हुडी ) , २ स्पोर्ट ड्रेस , २ नाईट ड्रेस , ३ नॅपकीन , थर्मल वॉटर बोटल ,नेलकटर , टॉवेल , अंडरवेअर -बनियन २ सेट , रेनकोट , स्कूल बॅग , योगा मॅट , स्टेशनरी साहित्य अशा सुमारे ४६ वस्तू असणारे सुमारे ४४ .५ लक्ष किंमतीचे स्लिपींग व स्कूल कीट 700 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले .
तसेच या उपक्रमातील लाभार्थी विद्यार्थ्यांची एच व्ही देसाई नेत्ररुग्णालय , महंमदवाडी , हडपसर यांचे वतीने नेत्र तपासणी देखील करण्यात आली .गरजू मुलांना मोफत चष्मे देण्यात येणार असून ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया पुणे येथे मोफत करून देण्यात येणार आहेत .
आवश्यक व गरजेचे साहित्य प्राप्त झाल्याने व नेत्र तपासणी झाल्याने सर्व शालेय विद्यार्थी व पालक आनंदून गेले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती व शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे .
या कार्यक्रमासाठी
SCAW team members:
Helen Scutt – Team Leader
Jeff McDougall – Assistant Team Leader
Kathy Ware
Eileen St Croix
तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष श्री तौहिद कॉन्ट्रॅक्टर , श्री पंकज आपटे सर , श्री समीर रुपानी सर , श्री परवेझ बिलीमोरीया सर भिगवण रोटरी क्लब चे अध्यक्ष संतोष सवाने संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत , सदस्य संजय रायसोनी, कुलदीपक ननवरे,रियाज शेख, रंजीत भोंगळे , शिव फाउंडेशन अध्यक्ष संपत बड़गर, संपत चौधरी शाम सतरले,निखिल बोगावत, प्रवीण वाघ,संजय खाड़े ,डॉ अमोल खानावरे किरण रायसोनी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे. भिगवण सरपंच दीपिका क्षीरसागर,तुषार क्षीरसागर , जावेद शेख, सारिका सवाने रत्नमाला रायसोनी ,रेखा खाडे , दीपाली भोंगळे,वैशाली बोगावत,नीलिमा बोगावत ,नाजिया शेख,मीणा बंडगर, शिवरानी खानवरे ,सुषमा वाघ ,स्कूल कमिटी गाड़े, शवकत सर्व शिक्षक सर्व शिक्षिका इतर मान्यवर उपस्थित होते.