June 28, 2025 3:18 pm

मतदान केंद्र क्रमांक १४४ माळीवाडा येथून इतरत्र स्थलांतराची मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

मतदान केंद्र क्रमांक १४४ माळीवाडा येथून इतरत्र स्थलांतराची मागणी

 

अमळनेर : विक्की जाधव

नगरपरिषद अमळनेरचे माजी नगरसेवक सचिन विभाकर कसार यांनी माळीवाडा येथील मतदान केंद्र क्रमांक १४४ अन्य ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे अधिकृत लेखी निवेदन सादर केले आहे.

पूर्वी वाडी चौकात असलेले हे मतदान केंद्र सध्या माळीवाडा भागातील एका जुनाट इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र सद्यस्थितीत हे केंद्र नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत असून, ये-जा करण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत असल्यामुळे मतदान प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे कसार यांनी नमूद केले आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व अपंग मतदारांना या ठिकाणी पोहोचण्यात अडचणी निर्माण होत असल्याने मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हे मतदान केंद्र हलवून नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळा क्र. ५ किंवा लोकमान्य शाळा येथे स्थानांतरित करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

तसेच, सदर मतदान केंद्र प्रभाग क्रमांक ११ मध्ये येत असल्याने केंद्र क्रमांक १४४ देखील प्रभाग क्र. ११ मध्ये जाहीर करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.

जाहिरात :

नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे, उमेदवारांनो लागा तयारीला..

तुमचा प्रचार – तुमच्या शब्दांत, पण अधिक परिणामकारक पद्धतीने…

तुमच्या कामांची माहिती – लोकांपर्यंत नेमकी पोहोचवण्याची जबाबदारी आमची…

तुमचा वार्ड, तुमची ओळख – आता होईल घराघरात पोहोचणारी…

“मार्मिक” तुमच्या प्रचाराचे खरे शस्त्र बनेल!

➤ बातम्या

➤ विशेष लेख

➤ सोशल मीडिया प्रचार

कळवा तुमची तयारी – आम्ही करु ती प्रभावी आणि ठसा उमटवणारी!

संपर्क : विक्की जाधव 9175050300

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!