सुसाट गाडी;गतिरोधक भारी-मदनवाडी चौकातील गतिरोधकाची अवस्था सपाट
(निलेश गायकवाड)
गतिरोधक का बसवले जातात? वर्दळीच्या ठिकाणी किंवा गाव शाळा अश्या ठिकाणी वाहनांच्या गती वरती मर्यादा यावेत तसेच वरदळीच्या ठिकाणी रहदारीला अपघात होऊ नये म्हणून गतिरोधक हे बसवले जातात. मदनवाडी चौकातील गतिरोधक सपाट गतिरोधक टाकल्यामुळे सुसाट वाहने पळत आहेत यामुळे अपघात देखील होत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. गतिरोधक कोणत्या नियमांच्या आधारावरती व कशा पद्धतीने बसविण्यात आले याचे कोणतेच मोजमाप दिसत नाही. गतिरोधक अगदी सपाट पद्धतीने असल्याने वाहनांची वेगाची मर्यादा ही अति वेगवान असल्याने अपघात घडत आहेत. तसेच हे गतिरोधक सपाट असल्याने मोकळे वाहने किंवा ऊस वाहतूक करणारे मोकळे ट्रॅक्टर कर्कश आवाज करत सुसाट पळत आहेत. या कर्कश आवाजामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच लहान मुलांना किंवा वयोवृद्ध व्यक्तींसाठी रस्ता पार करणे जिकरीचे झालेले आहे.
प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे जिथे सपाट सात गतिरोधक टाकण्यात येत आहेत तिथे दोनच गतिरोधक टाका जेणेकरून वाहनांची वेगावरती मर्यादा कमी राहील अपघात कमी होतील. तसेच गतिरोधकाजवळ पांढरे पट्टे देखील अजून मारलेले नाहीत त्यामुळे वाहन चालकांना गतिरोधक आहे का नाही यामध्ये गोंधळ होत आहे.