दगडी दरवाज्याजवळ असलेल्या बालाजी गोल्डला पार्किंगच् नाही. वाहतुकीस मोठी अडचण होऊन अपघाताचा धोका होतोय निर्माण
अमळनेर : विक्की जाधव.
दगडी दरवाज्याजवळ असलेल्या बालाजी गोल्डच्या परिसरात पार्किंगची सोय नसल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
या ठिकाणी लागून असलेला राज्य महामार्ग हा वर्दळीचा आहे. नगरपरिषदेनें ह्या मुद्द्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.
सराफ बाजार हे एक प्रमुख वर्दळीचे ठिकाण असून, येथे वाहनांची मोठी गर्दी असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांचे येणे-जाणे देखील याच मार्गावर होत असल्याने, बेशिस्त वाहन धारक, यासह बालाजी गोल्ड चे मालक,कर्मचारी रस्त्यावर वाहने लावण्यात सराईत आहेत यामुळे इतर चालकांना मोठा धोका निर्माण होत असून मोठा अपघात होऊ शेकतो.
बालाजी गोल्डच्या आसपास वाहनांची बेशिस्त पार्किंग केल्यामुळे रस्त्यावर वर्दळ आणि सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. नागरिकांना या समस्येमुळे नित्यनेमाने अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करून वाहनांची योग्य पार्किंग व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, आणि अशा बेशिस्त वाहन धाराकांवर कारवाई करणे हीं उचित ठरेल, ज्यामुळे सुरक्षिततेसह सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण होईल.
नागरिकांचा अपघाताच्या धोका समोर ठेवून त्यांच्या संरक्षणासाठी व योग्य वाहतूक व्यवस्थेसाठी यावर कार्यवाही होणे आवश्यक आहे.सामान्य नागरिक सराफ बाजार