महापुरुषांविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या राहुल सोलापूरकर वर दौंड मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आंदोलन.
प्रतिनिधि – विकी ओहोळ
8446119158
दौंड – राहुल सोलापूरकर ला साध्य काय करायचे आहे यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सोलापूरकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे दौंडकरांमध्ये व बहुजन समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून अभिनेता राहुल सोलापूरकर हे वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. यापूर्वी सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. आग्रा सुटकेबाबत त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवप्रेमींसह सर्वांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले, यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. दौंड शहरात राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन करण्यात आले. सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.
महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम सोलापूरकर करत असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अमित सोनवणे यांनी केला आहे. वाचाळवीर सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संविधान स्तंभ दौंड येथे सर्वपक्षीय आंदोलन झाले.
यावेळी दौंड शहरातील समस्त बहुजन समाज व सामाजिक कार्यकर्ते अमित सोनवणे, प्रमोद राणेरजपूत ,सागर उबाळे, निखिल स्वामी, सचिन कुलथे ,सचिन गायकवाड, विनय लोटके, संजय चितारे ,फारुख कुरेशी,फिरोज तांबोळी, प्रकाश सोनवणे, प्रभाकर कोरे, चांद शेख, यादव जाधव, अमित कदम, राजेंद्र सोनवणे, विनायक मोरे, महेश जगदाळे, सोनु मेलकरी आदी उपस्थित होते.