June 29, 2025 5:22 pm

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी..

 

अमळनेर: विक्की जाधव.

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील, संचालक पराग पाटील, प्रा. देवेश्री पाटील, शाळेचे प्राचार्य डॉ. निरज चव्हान, तसेच प्रमुख वक्ते श्री अतुल डोळस सर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर, अतुल डोलस सरांनी छत्रपती शिवराय यांच्या जीवनचरित्रावर एक सुंदर व्याख्यान दिले, ज्याने संपूर्ण शालेय वातावरण शिवमय बनवले. त्यांचे विचार आणि ज्ञानाने विद्यार्थ्यांना प्रेरित केले.पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका ज्योत्स्ना पाटील आणि समाजशास्त्र शिक्षक रविंद्र ठाकरे यांनी शिवरायांच्या महतीवर भाषण करून त्यांच्या कार्याची महत्त्वता दर्शवली. चिमुकल्यांनी त्यांच्या सृजनशील नृत्याद्वारे शालेय वातावरणातील उत्साह आणखी वाढवला. त्यांच्या सुंदर नृत्याने उपस्थितांची मने जिंकली आणि शाळेत एक आनंददायक वातावरण तयार केले. यावेळी, प्रमुख व्याख्याते अतुल डोळस सरांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिवरायांच्या जयघोषाने शालेय परिसर प्रफुल्लित झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले. शाळेचे कीडा शिक्षक रमेश धनगर सरांनी लाठी-काठी प्रात्यक्षिकाद्वारे शिवकालीन युद्धकलेचे अप्रतिम दर्शन घडविले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील युद्धकलेची जाणीव अधिक गहन झाली.

या कार्यक्रमांच्या माध्यमातून अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलने शिवजयंती उत्साहात साजरी केली आणि विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव जागृत करण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!