शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवचा स्पार्क फाउंडेशन नें केला गौरव..
अमळनेर: विक्की जाधव.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध उत्सव आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने स्पार्क फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंती आयोजन समिती व मंडळ यांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
शहरातील शिवप्रेमी आणि समितीतील सदस्यांनी अथक परिश्रम घेत शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला. स्पार्क फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच पुरातन शस्त्र संग्राहक आणि अभ्यासक श्री पंकजभाऊ दुसाने. श्री. आनंद माळी सर, श्री. राहुल पाटील सर, श्री. स्वर्णदीप राजपूत सर, सित्तक दुसाने यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. स्पार्क फाऊंडेशन यांच्या तर्फे आयोजन समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.यात राजमुद्रा फाऊंडेशन ढेकू रोड, छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा, मिल चाळ परिसर, कन्हैया मित्र मंडळ, अमळनेर आणि पैलाड भागातील शिवजयंती उत्सव समित्यांचा सत्कार करण्यात आला. शिवजयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी शिवभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पार्क फाऊंडेशनतर्फे सत्कार झाल्याने आयोजन समितीच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला.
या सोहळ्यात शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते.