June 29, 2025 10:50 pm

तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन जागृत देवस्थान श्री क्षेत्र ममलेश्वर महादेव मंदिर संस्थान झाडी येथे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सव. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन जागृत देवस्थान श्री क्षेत्र ममलेश्वर महादेव मंदिर संस्थान झाडी येथे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सव. 

 

अमळनेर : विक्की जाधव 

26 फेब्रुवारी 2025 रोजी श्री शेत्र ममलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सर्व झाडी पंचक्रोशीतील शिवभक्तांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊन श्री ममलेश्वर महादेवांचा दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विविध कार्यक्रमाच्या फोटोग्राफी साठी संपर्क करा. 9175050300

यात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारचे दुकाने, हॉटेल्स, पालख्या, झुले आणि मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे: 25 फेब्रुवारी 2025, मंगळवार:  गाव आणि परिसरातील महिलांची भव्य जल कलश यात्रा आयोजित करण्यात येईल. महिलांचा आनंद उत्सव मेळावा असेल, ज्यामध्ये रांगोळी स्पर्धा देखील होईल. 26 फेब्रुवारी 2025, बुधवार: सकाळी 8 वाजता भव्य ध्वज मिरवणूक होळी चौकातून निघेल. ध्वज मिरवणूक डीजेच्या तालावर वाजत गाजत देव बल्ली परिसरात येईल, नंतर ममलेश्वर महादेव मंदिरावर ध्वज लावण्यात येईल. ध्वज लावल्यावर मंदिरावर अभिषेक करण्यात येईल. मंदिर परिसरात प्रसिद्ध पंकजजी रवींद्र दुसाने (पी एन ज्वेलर्स झाडीकर सराफ) यांचे स्पार्क फाउंडेशन सादर करणार आहेत. यामध्ये ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, जे 26 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालेल.

संध्याकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत खान्देशातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रविकिरण महाराज दोंडाईचांकर यांचे जाहीर कीर्तन होणार आहे.

27 फेब्रुवारी 2025, गुरुवार:संध्याकाळी 8 वाजता गावातील आजी-माजी फौजी यांना वीर गौरव पुरस्कार ममलेश्वर महादेव संस्थान यांच्या तर्फे प्रदान करण्यात येणार आहे.

यात्रेच्या साजऱ्या कार्यक्रमामुळे सर्व वयोगटातील लोकांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. झाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व शिवभक्तांना नम्र विनंती करण्यात येते की, त्यांनी या महाशिवरात्री यात्रोत्सवात उपस्थित राहून श्री ममलेश्वर महादेवांचे दर्शन घ्यावे आणि सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्या.

या उपक्रमासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून, एकत्र येऊन ह्या धार्मिक आणि सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!