अमळनेर करांची मानाची सार्वजनिक शिवजयंती भव्य मिरवणूक व युवकांचे रक्तदान शिबिराच्या उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी झाली
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेरमध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने अनेक आकर्षक उपक्रम आयोजित करण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक आणि युवकांचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
विविध प्रकारच्या फोटोग्राफी साठी संपर्क करा. मो.9175050300
सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रगण्य असलेल्या अमळनेर रक्तदान चळवळीने यंदाही १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते ७ या कालावधीत नाट्यगृह परिसरात युवकांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केले. यंदा भव्य दिव्य मिरवणूक पारंपारिक कलापथकांच्या सहभागाने आकर्षक ठरली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
मिरवणूक अमळनेर नगरपरिषद हायस्कूलच्या मैदानातून मान्यवरांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नेरकर आणि पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी शिवपूजन केले. मिरवणुकीत सायरदेवी बोरा स्कूल, न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या शाळकरी मुलांचे पथनाट्य व देखावे लक्षवेधी ठरले. रमाई लेझीम महिला पथक, वाडी संस्थांचे बाल भजनी मंडळ, आणि जीत स्टुडिओचे नृत्य यामुळे कार्यकमात रंगत वाढली. मिरवणुकीत भव्य असा शिवजयंतीचा देखावा आणि बाल शिवाजी सजवलेल्या ट्रॅक्टरने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मिरवणूक विजय मारुती मंदिर येथे पोचल्यावर लाडू वाटप करण्यात आले, आणि शामील संदीप पाटील, भावेश जैन, सिद्धू चौधरी, योगेंद्र माळी व तुषार बाविस्कर यांच्या कडून शितपेय, लस्सी वाटप करण्यात आले. विजय मारुती मंदिर येथे मिरवणूक थांबवून हनुमान चालीसा पठण करण्यात आले, ज्याने वातावरणात भक्तिपूर्वकता वाढवली.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही या शिवजयंती मिरवणुकीस भेट दिली. मिरवणूक दरम्यान ठिकठिकाणी पिण्याचे पाणी वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे उपस्थित लोकांना मोठा लाभ झाला.
समारोप प्रसंगी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांच्या परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे शिव भक्तांसाठी शिव भंडारा आयोजित केला. या कार्यक्रमात रणरणत्या उन्हात जल्लोष करणाऱ्या शिवभक्तांसाठी मठ्ठा वाटपही केले गेले. तसेच, मिरवणुकीत सहभागी झालेल्या कलापथकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या उपक्रमासाठी मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे सहकार्य लाभले असून, सुप्रसिद्ध बिल्डर सरजूसेठ गोकलानी, मुंदडा बिल्डर्सचे अमेय मुंदडा, आदित्य बिल्डर्सचे प्रशांत निकम, ॲड. दिनेश पाटील, कृ उ बा संचालक सचिन पाटील, भिकेश पाटील यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
या शिवजयंती उत्सवाने अमळनेर शहरात एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण केले, ज्यामुळे लोक एकत्र आले आणि आपल्या सांस्कृतिक वारसाचे पुनरुद्धारण झाले.