अमळनेर शहराचा तिसरा डोळा: निकामी लोकप्रतिनिधींची निष्क्रियता शहराचा विकास काय?
अमळनेर: विक्की जाधव
अमळनेर शहरात सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी शहराच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची काळजी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन घेत नाहीत का, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. निवडणुकीच्या काळात मोठमोठे आश्वासन देण्यात सराईत असलेले लोकप्रतिनिधी? परंतु शहराचा विकास कागदावरच राहतोय.
सध्या शहरातील 80% सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने, शहरात चोरीच्या घटनांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने संयुक्तपणे प्रयत्न करून या कॅमेऱ्यांना पुनः सुरू करणे आवश्यक आहे.
मागील काही काळात महिलांच्या चैन स्नॅचिंग आणि दरोड्यांच्या घटना होऊ लागल्या, तेव्हा तत्कालीन डीवायएसपी राकेश जाधव आणि पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या प्रयत्नाने, तसेच देणग्या स्वीकारून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित करण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाने, ते आता बऱ्याच काळा पासून बंद पडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरी, सोनसाखळी ओढणे आणि दमबाजी करून लुटणे यांच्या घटनांत लक्षनीय वाढ झाली आहे. परंतु सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडचणी येत आहेत.
आपल्या शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा एक गंभीर प्रश्न आहे आणि यावर तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. अमळनेरच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे.