February 20, 2025 4:40 pm
न्यूज
ब्रेकिंग

गाव हेच देऊळ आहे आणि त्या देऊळlतील देव म्हणजेच त्या गावातील लोक असे सांगून त्यांनी जनसेवेचे तत्व लोकांचा मनात भजनाने रुजवन्याचे प्रयत्न व.राष्ट्रसंत श्री तूकडोजी महाराजानी केले :-विशाल दा. निंबाळकर..

मामा मंत्री झालेत आता भिगवण चे बसस्थानक बारामती सारखे जरी नाही झाले तरी डागडुजी नक्की होईल ना..?

अमळनेर करांची मानाची सार्वजनिक शिवजयंती भव्य मिरवणूक व युवकांचे रक्तदान शिबिराच्या उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी झाली.

तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन जागृत देवस्थान श्री क्षेत्र ममलेश्वर महादेव मंदिर संस्थान झाडी येथे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सव. 

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी..

बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार !

अपनी भाषा में पढ़े! Translate

मार्मिक समाचार घडामोडी

बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार !

जळगाव | १२ फेब्रुवारी २०२५
जळगाव तालुक्यातील धोबी वराड ते वावडदा रस्त्यावरील सुभाष वाडी परिसरात एका बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास गोऱ्हावर हल्ला करत ठार केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धोबी वराड ते वावडडा रस्त्यानजीक असलेल्या शेत रस्त्यावरील सुभाष वाडी शिवार परिसरात दिनांक 12 फेब्रुवारी 2024 मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास एका बिबट्याने गोविंद नाना जाधव यांच्या शेतात बांधलेल्या गोऱ्हावर हल्ला करत ठार केल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत गोविंद जाधव यांचे 25 ते 30 हजाराचे नुकसान झाले आहे. गोविंद जाधव हे सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या शेतात कामानिमित्त आले असता. त्यांना गोऱ्याचा मृतदेह दिसल्याने त्यांनी शेता आजूबाजू परिसरातील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला. ही घटना वाऱ्याच्या वेगाने गावात पसरल्याने गावातील माजी सरपंच विकास जाधव युसुफ शहा याकुबशहा सचिन जाधव माणिक जाधव गणेश जाधव सुभाष जाधव यांच्यासह गावातील मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली होती.

२२ वर्षीय युवकाला जी.बी.सिंड्रोम
यावल : प्रतिनिधी
तालूक्यातील थेरोळा येथील एका २२ वर्षीय युवकाला जी.बी. सिंड्रोम सदृश आजाराची लक्षणे आढळून आली आहे. ऐनपूर प्राथमिक केंद्रातून त्याला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, थेरोळा येथील युवक प्रयागराज येथून नुकताच परतला होता. त्याला एका पायाने चालणे कठीण झाले होते. त्यामुळे तो ब-हाणपूर येथे उपचारासाठी गेला. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याला मुंबई येथे जाण्याचा सल्ला दिला. मात्र आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने तो घरीच पडून होता. थेरोळा सरपंचांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन परदेशी यांनी तपासणी केली आणि त्याला जळगाव येथे उपचारासाठी पाठवले. युवकाच्या घरात आई, वडील असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन आरोग्य तपासणी करण्याबाबत दक्षता घेतली जाणार आहे.

फोटो व्हायरलची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !
जळगाव : प्रतिनिधी
फोटो व्हायरल करण्यासह पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत ३२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. हा प्रकार ८ जुलै २०२२ ते १२ जून २०२३ यादरम्यान एका हॉटेलमध्ये घडला. विनोद रामचंद्र पाटील (रा. श्रावणनगर, काशीनाथ नगरजवळ) याच्याविरुद्ध १० फेब्रुवारी रोजी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ शहरातील एका ३२ वर्षीय विवाहितेशी विनोद पाटील याची ओळख झाली. त्याने जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये या विवाहितेवर अत्याचार केला. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी व फिर्यादीच्या पतीकडून वेळोवेळी पैसेही उकळले. तसेच पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तो विवाहितेचा छळ करीत राहिला. तपास पोउनि प्रिया दातीर करीत आहेत.

एरंडोल पोलिसांची धाड : अवैध गॅस भरणा केंद्रावरून ४ गॅस सिलिंडर जप्त !
एरंडोल : प्रतिनिधी
धरणगाव रोडलगत पत्र्याच्या शेडमध्ये वाहनात अवैधरित्या गॅस भरणा करणाऱ्या एका इसमास पकडले. याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल पोलिस स्टेशन तर्फे मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील धरणगाव रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या विनापरवाना वाहनांमध्ये गॅसभरणा करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसोबत तातडीने याठिकाणी धाड टाकली असता तिथे मंगेश नगराज महाजन (१९, बालाजी मढीजवळ, एरंडोल) हा सापडला. दरम्यान, एरंडोलमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे तालुक्यातही अवैधरित्या वाहनात गॅस भरले जात असल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणातील आरोपी मंगेश महाजन याच्याकडून ४ गॅस सिलिंडर, ४ रिकामे सिलिंडर तर सिलिंडरमधून वाहनात गॅस भरण्यासाठीचे मशीन असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाइ पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कपिलदेव पाटील, विलास पाटील, पो. ना. सचिन पाटील यांनी केली.

 

शुल्लक वादातून ५२ हजारांचा कापला हरभरा !
अमळनेर : प्रतिनिधी
शेतीच्या गट नंबरवरून असलेल्या वादातून तिघांनी शेतातील ५२ हजार ८०० रुपयांचा १० ते ११ क्विंटल हरभरा कापून नेल्याची घटना ९ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील खोकरपाट येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, उमाबाई गुमानसिंग पाटील (उमरोळी, ता. जि. पालघर, मूळ रा. खोकरपाट) यांची खोकरपाट येथे जमीन आहे. त्यांनी शेतात हरभरा लावला होता. मात्र हा गट नंबर चुकीचा असल्याचा दावा साहेबराव सुखदेव पाटील, रघुनाथ सुखदेव पाटील, भाऊसाहेब सुखदेव पाटील यांनी केल्याने शेताच्या मालकीवरून त्यांच्याशी वाद सुरु आहे.
उमाबाई ९ रोजी आपले शेत पाहण्यासाठी जेठ भरतसिंग पाटील तसेच रणजित पाटील, सुपडू पाटील यांच्यासोबत गेल्या असता तिघेजण त्यांच्या शेतातून हरभरा कापून नेत होते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याने उमाबाई व इतर माघारी फिरले. पुन्हा १० रोजी शेत पाहण्यासाठी उमाबाई गेल्या असता त्यांना शेतातील १० ते ११ क्विंटल ५२ हजार ८०० रुपये किमतीचा हरभरा चोरीस गेल्याचे आढळून आले. त्यांनी फिर्याद दिल्यावरून साहेबराव पाटील, रघुनाथ पाटील, भाऊसाहेब पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील तीन मुलांनी चोरला घोडा : पोलिसांनी पकडला !
जळगाव | १२ फेब्रुवारी २०२५
शहरातील सिंधी कॉलनी, गणेश नगर येथील कृष्णा आनंदा जोशी यांचा बग्गीचा व्यवसाय असुन त्यांच्या मालकीचा एक लाख रूपये किंमतीचा सिंधी जातीचा घोडा हा त्यांनी कुसुंबा शिवारात मोकळ्या जागी बांधलेला असतांना दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. त्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळावरील आजुबाजुचे परीसरातील जवळपास ३५ सिसिटीव्ही तपासले असता तिन मुलं सदर घोडा चोरी करुन घेवुन जात असतांना दिसले. याची सखोल तपास करता ती मुले शिवाजी नगर व कोंबडी बाजार परीसरात राहत असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर मुलांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस करता त्यांनी गुन्ह्याबाबत कबुली दिली असुन, त्यांच्या ताब्यातुन फिर्यादी यांचे मालकीचा चोरीस गेलेला घोडा हा ताब्यात घेण्यात आलेला आहे.
पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !
जळगाव | १२ फेब्रुवारी २०२५
पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत हॉटेल प्रगती पॅलेस येथे विवाहितेवर अत्याचार केला तसेच फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे घेवून शारिरीक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहितेवर जळगाव शहरातील हॉटेल प्रगती पॅलेस येथे संशयित आरोपी विनोद रामचंद्र पाटील (रा. श्रावण नगर, जळगाव) याने अत्याचार केला. तसेच फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासह व तिच्या पतीकडून पैसे घेतले, त्यानंतर पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार ८ जुलै २०२२ ते १२ जून २०२३ दरम्यान घडला आहे. या संदर्भात पीडित महिलेने अखेर १० फेब्रुवारी रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी विनोद रामचंद्र पाटील यांच्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउनि प्रियादारी करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!