जेईई मुख्य परीक्षेत हेत रिद्धी सचिन शेठ यांचा ऐतिहासिक यश !!!!
जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक
जळगाव जिल्ह्यातील हेत रिद्धी सचिन शेठ याने JEE 2025 मुख्य परीक्षेत भौतिक शास्त्र रसायन शास्त्र गणित या विषयातून 99.95 पर्सेंटाइल गुण मिळवून त्याने जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन केला आहे. हेत रिद्धी सचिन शेठ याचे हे यश त्याच्या समर्पणाचे आणि मेहनतीचे फलित मानले जात आहे. हेतने आपल्या यशाबद्दल बोलताना सांगितले की, तो आपल्या ज्ञानाचा उपयोग करून समाज सेवा करण्याचा दृढ निश्चय करतो. त्याच्या या विचारामुळे त्याला समाजातील सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदन करण्यात येत आहे. हेत रिद्धी सचिन शेठ यांच्या यशामुळे जळगाव जिल्हा गर्वित झाला आहे आणि त्याचे हे योगदान इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरेल. यशाच्या शिखराचे पोहोचलेल्या हेत याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा,,!!!