February 20, 2025 4:44 pm
न्यूज
ब्रेकिंग

गाव हेच देऊळ आहे आणि त्या देऊळlतील देव म्हणजेच त्या गावातील लोक असे सांगून त्यांनी जनसेवेचे तत्व लोकांचा मनात भजनाने रुजवन्याचे प्रयत्न व.राष्ट्रसंत श्री तूकडोजी महाराजानी केले :-विशाल दा. निंबाळकर..

मामा मंत्री झालेत आता भिगवण चे बसस्थानक बारामती सारखे जरी नाही झाले तरी डागडुजी नक्की होईल ना..?

अमळनेर करांची मानाची सार्वजनिक शिवजयंती भव्य मिरवणूक व युवकांचे रक्तदान शिबिराच्या उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी झाली.

तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन जागृत देवस्थान श्री क्षेत्र ममलेश्वर महादेव मंदिर संस्थान झाडी येथे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सव. 

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी..

अमळनेर: मुंदडा नगर परिसरात नगरपरिषदेने ८० फुटी डीपी रस्त्यासाठी ७० अतिक्रमण काढले 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर: मुंदडा नगर परिसरात नगरपरिषदेने ८० फुटी डीपी रस्त्यासाठी ७० अतिक्रमण काढले 

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील मुंदडा नगर भागाततुन जाणाऱ्या ८० फुटी डीपी रस्त्यावरून ७० अतिक्रमणे नगरपरिषदने काढले आहेत.

मुंदडा नगर 1, मुंडडा नगर 2, गुरुकृपा कॉलनीचा मागचा भाग, विद्याविहार कॉलनीचा मागचा भाग आणि ड्रीम सिटीला लागून असलेल्या भागावर अतिक्रमणाचे मोठ्या प्रमाणावर काम असल्याने रस्ता तयार करण्यास अडचणी येत होत्या. अनेक नागरिकांनी येथे घरे, कंपाउंड, पक्के बांधकाम, आणि झाडे लावून ठेवल्याने रस्त्याचे काम करणे कठीण झाले होते.

मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी या अतिक्रमणांवर कारवाई केली. या भागातील काही नागरिकांनी या कारवाई विरोध करण्याचा प्रयत्न केला तरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच शहराच्या विकासासाठी अतिक्रमण काढणे अत्यंत आवश्यक असल्याचे समजावत, अडथळा ठरणारे सर्व अतिक्रमण काढण्यात आले.

अतिक्रमण काढण्यासाठी बांधकाम विभागाचे अभियंता डिगंबर वाघ, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांचा सहकार्य लाभले.

यावेळी स्थानिक नागरिकांमध्ये आणि अधिकार्यांमध्ये शाब्दिक वाद झाले. अनेक अतिक्रमण धारकांनी या कारवाईचा विरोध केला आणि काहींनी असा आरोप केला की “काहीचे अतिक्रमण का नाही काढले?” या संदर्भात राजकीय हस्तक्षेप असल्याचा उल्लेख केला. 

शहरातील विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदाचे हे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरीही, आमच्या शहरात योग्य आणि न्याय्य निर्णय घेण्यासाठी सर्व स्तरावर सहकार्य आणि संगोपन गरजेचे आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!