गाव हेच देऊळ आहे आणि त्या देऊळlतील देव म्हणजेच त्या गावातील लोक असे सांगून त्यांनी जनसेवेचे तत्व लोकांचा मनात भजनाने रुजवन्याचे प्रयत्न व.राष्ट्रसंत श्री तूकडोजी महाराजानी केले :-विशाल दा. निंबाळकर..
व.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 56 वा पुण्यस्मरण महोत्सव श्री गुरुदेव सेवा महिला व पुरुष भजन मंडळ बालाजी वॉर्ड
इथे संपन्न.
विठ्ठल मंदिर प्रभाग बालाजी वॉर्ड श्री गुरुदेव सेवा महिला व पुरुष भजन मंडळ द्वारे आयोजित वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 56 वा पुण्यस्मरण महोत्सव सोहळा पार पडला.या मंडळ द्वारे प्रभागात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळ गाव स्वछता अभियान, पालखी प्रभात फेरी काढून भजनाने भक्तिमय वातावरण निर्मिती, व. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे भजन म्हणून शेकडो सेवेकरी सहभागी झाले. सायंकाळी उपस्थित मान्यवराचे व श्री गुरुदेव सेवा मंडळ पदाधिकारी यांचे शाल श्री फळ देऊन त्यांच्या सन्मान सुद्धा करण्यात आले होते.माजी नगरसेवक विशाल निंबाळकर कार्यक्रम स्थळी बोलताना बोलेल कि वंदनीय राष्टसंत श्री तुकडोजी महाराजांनी आजन्म अखिल मानवच्या सुख समृद्धी साठी जीवनाच्या अखेर च्या क्षणापर्यंत अविरत परिश्रम घेतले आणि खजंरी चा माध्यमातून नवीन पिढीला संदेश दिला.
या कार्यक्रम ला प्रमुख उपस्थिती मध्ये माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, माजी नगरसेवक दीपकबाबू जयस्वाल, माजी नगरसेविका सौ. अनुराधा ताई हजारें , श्री दत्ताभाऊ हजारें जिल्हा सेवाधिकारी, श्रीमती प्रेमीलाताई गटलेवार, सौ. पुष्पाताई पायघन,राहुलजी देवतळे, श्रीमती नंदाताई जोशी, श्रीमती आशाताई बुरडकर, तिवसकर काका, राखुडेभाऊ, संजूभाऊ सोनटक्के, उपरकार भाऊ यांची उपस्थिती होती. कार्यक्रम नंतर राष्ट्रवंदना, काला वाटप व महाप्रसाद करण्यात आले.