विद्या-निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी विद्यालयातील शिक्षक श्री. दिपक वडापुरे यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित
(समीर बळे प्रतिनिधी)
दिः११ पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघ संलग्न इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघ इंदापूर हिंदी निबंध/वक्तृत्व प्रतियोगिता / पुरस्कार समारोह उपक्रमशील अध्यापक आदर्श हिंदी अध्यापक / विद्यार्थी /सेवानिवृत्त हिंदी अध्यापक गुणगौरव
पुरस्कार समारंभ सोहळा केतकेश्वर सांस्कृतिक भवन निमगाव येथे संपन्न झाला.
मा.श्री दत्तात्रय सावंत सर (माजी आमदार पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) यांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षक २०२४/२५ विद्या-निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी विद्यालयातील हिंदी विषयाचे प्रभावी अध्यापन करणारे तज्ञ शिक्षक.श्री. दिपक जगन्नाथ वडापुरे सर यांचा उपक्रमशील शिक्षक म्हणून यांचा केतकेश्वर सांस्कृतिक भवन निमगाव केतकी येथे पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मा.श्री.दत्तात्रय सावंत (आमदार- पुणे विभाग शिक्षक मतदार संघ), मा.श्री.ता.का. सुर्यवंशी(उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ),मा.श्री.पाटील जे.एन.(अध्यक्ष-मुख्याध्यापक संघ इंदापूर),मा.श्री. संजीव मांढरे(अध्यक्ष, पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघ),मा.श्री. उस्मान मुलाणी
(सदस्य-महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ)मा.श्री.राजेंद्र रणमोडे
(उपाध्यक्ष, पुणे हिंदी अध्यापक संघ),मा.श्री. सुधाकर भोंग (पुणे जिल्हा समन्वयक, श्री.शत्रुघ्न कानगुडे(अध्यक्ष-हिंदी अध्यापक संघ इंदापूर),श्री भोंग के.डी.(सचिव-हिंदी अध्यापक संघ इंदापूर) श्रीमती भोसले मनीषा( सल्लागार व मुख्याध्यापिका), मुख्याध्यापक संघ, विषय शिक्षक संघटना, संघटनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.