अमळनेर नगरपरिषदेची प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई खरी पण मोजक्याच ठिकाणी ? सामान्य नागरिक.
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषदेतर्फे आज दिनांक 16.01.2025 रोजी प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई करण्यात आली. यात १२० मायक्रोन पेक्षा कमी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या कॅरीबॅग यांचा वापर केल्याकारणाने चार दुकानदारांना एकूण २६०० रुपये दंड ठोठावला. तर काही ठिकाणीच अशी कार्यवाही झाली असून शहरात प्लास्टिक चा वापर सर्रास सुरू आहे. हीं कार्यवाही धडकी भरवणारी जरी असली तर ती सतत सुरू ठेवणं हीं नैतिक जबाबदारी असून अधिकार्यनी कोणाला पाठीशी घालु नये असे जण सामान्यांतुन सुरु उमटू लागले आहेत.
तर कार्यवाहीत एकूण 7.5 किलो प्लास्टिक जप्त केले ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.अमळनेर नगरपरिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाकडून प्लास्टिक बंदी अभियानात सातत्य राखत गुरुवारी शहरातील बाजारपेठ परिसरातील संजय प्लास्टिक ,बाबा प्लास्टिक ,कोमल हॉटेल यश चायनीज़, महेंद्र चायनीज़ ,आर के पावभाजी व माता प्रसन्न पाणी पूरी याच्याकड़े बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, पन्नी आढळून आल्याने कार्यवाही करण्यात आली. यात यश चायनीज़, महेंद्र चायनीज़ ,आर के पावभाजी यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक साठवणूक व विक्री केल्याबद्दल २५००/- तर माता प्रसन्न पाणी पूरी यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग मधून विक्री केल्याबद्दल १००/- रुपये दंड आकारण्यात आला.
नगरपरिषद मुख्याधिकारी वेवोतोलू केजो (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉस्टिक बंदी करत कारवाई करताना पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे तसेच शहर समन्वयक गणेश गढरी , पथक कर्मचारी ,शामराव करंदीकर , योगेश पवार, यूनूस शेख, यानीही कार्यवाही केली. दरम्यान मुख्याधिकारी यांनी सर्व नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅग यांचा वापर न करण्याचे व कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे व आपला परिसर स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.