भिगवण मध्ये पत्रकारांचा सन्मान करीत पत्रकार दिन साजरा;भिगवण पोलीस स्टेशन व रोटरी क्लब आयोजित….

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण मध्ये पत्रकारांचा सन्मान करीत पत्रकार दिन साजरा;भिगवण पोलीस स्टेशन व रोटरी क्लब आयोजित…

(निलेश गायकवाड)

पत्रकार कायम आपल्या लेखणीने सभोवताली घडणाऱ्या गोष्टीचे निरीक्षण, अवलोकन तसेच सामाजिक दायित्व म्हणून प्रश्न सोडविण्यास प्रशासनास सहकार्य करतात. त्यांच्या लेखणीने प्रशासनास कायम दक्ष राखण्यास मदत मिळते. पत्रकार दिन सन्मान करण्याचे भाग्य लाभले याचे आपणांस देखील समाधान आहे.असे प्रतिपादन भिगवण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी केले.आयोजित सन्मानप्रसंगी ते बोलत होते.

यासह भिगवण शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वानी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत सन्मान करण्यात आला.तसेच विशेष काम करणारे स्वयंसेवक यांचा देखील प्रशिस्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी भिगवण रोटरी क्लब चे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, शिव फाउंडेशन चे अध्यक्ष संपत बंडगर तसेच माजी अध्यक्ष संजय खाडे,किरण रायसोनी, प्रवीण वाघ, कमलेश गांधी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब चे विद्यमान अध्यक्ष संतोष सवाने यांनी बोलताना सांगितले पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांच्या निर्भीड, निःपक्षपाती लेखणीमुळे अन्यायाला वाचा फुटते. सर्वसामान्य नागरिक आणि वंचितांना न्याय मिळतो. यासह चुकीच्या गोष्टीना पायबंद घालण्याची भूमिका पत्रकार कायम निभावत असतात.

तसेच जेष्ठ पत्रकार प्राध्यापक प्रशांत चौरे सर यांनी बोलताना सांगितले पत्रकार हा कायम समाजाच्या प्रती सतर्क राहत दिशाहीन झालेल्या व्यक्तीस दिशा देण्याचे काम निस्वार्थ भावनेने करतात. त्यांनी लिहलेली प्रत्येक बातमी समाजासह प्रशासनास, व्यक्तीस आणि सर्वसामान्य नागरिकांना लढा देण्याचे बळ निर्माण करते. त्यांच्या कार्याचा आणि निरपक्ष पत्रकारितेचे कौतुक करणे म्हणजे शाबासकीची थापचं असते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री महादेव बंडगर सर यांनी केले तर आभार निलेश गायकवाड यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!