इंदापूर महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर
प्रतिनिधी.भगवान लोंढे
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इंदापूर महाविद्यालयातील 190 विद्यार्थिनींचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये हिमोग्लोबिन ची तपासणी आणि आरोग्य विषयक माहिती देण्यात आली.
या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माननीय प्राचार्य डॉ.जीवन सरवदे आणि उपप्राचार्य माननीय प्रा. दत्तात्रय गोळे यांनी विद्यार्थिनींना शालेय जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःचे आरोग्य व्यवस्थित कसे सांभाळायचे याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.कल्पना भोसले यांनी विद्यार्थिनींना पौष्टिक आहाराचे आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये दीडशे हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला तसेच त्यांची हिमोग्लोबिन तपासणी केली. या तपासणीसाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य श्री.धन्यकुमार माने, आणि श्री हर्षवर्धन सरडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. आरोग्य तपासणी शिबिरासाठी प्रा.सुनील सावंत , प्रा.अमोल मगर , प्रा.अमित दुबे , प्रा. रोहिदास भांगे , प्रा. रवींद्र साबळे तसेच महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक रा.से.यो.विभाग कार्यक्रम अधिकारी सौ. सुवर्णा जाधव यांनी केले , सूत्रसंचालन प्रा.राजीव शिरसट यांनी केले तर आभार प्रा.कल्याणी देवकर यांनी मानले.