February 20, 2025 8:01 pm
न्यूज
ब्रेकिंग

गाव हेच देऊळ आहे आणि त्या देऊळlतील देव म्हणजेच त्या गावातील लोक असे सांगून त्यांनी जनसेवेचे तत्व लोकांचा मनात भजनाने रुजवन्याचे प्रयत्न व.राष्ट्रसंत श्री तूकडोजी महाराजानी केले :-विशाल दा. निंबाळकर..

मामा मंत्री झालेत आता भिगवण चे बसस्थानक बारामती सारखे जरी नाही झाले तरी डागडुजी नक्की होईल ना..?

अमळनेर करांची मानाची सार्वजनिक शिवजयंती भव्य मिरवणूक व युवकांचे रक्तदान शिबिराच्या उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी झाली.

तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन जागृत देवस्थान श्री क्षेत्र ममलेश्वर महादेव मंदिर संस्थान झाडी येथे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सव. 

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी..

इंदापूर महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम ‘मला आय.ए.एस.(IAS) व्हायचंय’

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम ‘मला आय.ए.एस.(IAS) व्हायचंय’
इंदापूर. प्रतिनिधी भगवान लोंढे .
– हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचा स्पर्धा परीक्षेचा उपक्रम
– विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता असे उपक्रम महत्त्वपूर्ण – प्राचार्य डॉ. जीवन सरवदे
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आयोजित ‘मला आय.ए.एस. व्हायचंय ‘या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कला शाखेवर आधारित, चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, तसेच भाषा विषय या घटकावर भर देण्यात आला.
प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,’महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचा हा अनोखा व अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भातील उजळणी तसेच त्याविषयीची सर्वांगीण माहिती उपलब्ध होण्यासाठी असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरतात.’
उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे म्हणाले की,’ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस महाविद्यालयात अनेक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येतो.’
डॉ. शिवाजी वीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. भिमाजी भोर, प्रा.कल्पना भोसले,प्रा.सुनील सावंत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. राजीव शिरसट यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!