अमळनेर नगर पालिकेच्या भंगार चोरांना पाठीशी घालण्याचां होतोय प्रयन्त.
पालिकेच्या भंगार चोर यांच्या विरोधात एकटा लढतोय परेश उदेवल.
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद पाणी पुरवठा विभागातून मागील काही वर्षा पासून पालिकेचे स्व:मालकीचे पाण्याचे व्हाल, नळ, टी, कपलिंग, पाणी व्हाल, पाण्याचे पंप आणि इतर मोठया प्रमाणात असलेले भंगार परस्पर हम करे सो कायदा. कोणत्याही प्रकारचे लिलाव पद्धत न करता परस्पर अवजड लोखंड गहाळ करून घर भरणी करणाऱ्या टोळीस पालिका आणि पालिका प्रशासन पाठी घालण्याचा प्रयत्न करीत आहे.
उपोषण स्थळी उज्जत घालण्याचाही झाला प्रयत्न..
उपोषणकर्ता परेश जवळ भंगार चोर प्रतिनिधी उपोषणस्थांळी घालतात हुज्जत, यां ठिकाणी घाणीचे ही साम्राज्यअसुन पालिका जाणूनबुजून उपोषण स्थळी स्वच्छता ठेवत नाही. असा उपोषकर्ता यांचा आरोप. काल दि. १७ रोजी पालिकेचे उप मुख्यांधिकारी यांनी तुला काय लागणार आहे. हें सांग अशे भाष्य करत तुला व्यवस्थित बघतो. तर पालिकेचे एक कर्मचारी यांनाही तू येथे का आलास?? तुला नेमकी कोणाची बाजु मांडायची आहे. अशी भाषा वापरून हुज्जत घातली.
अमळनेर पालिकेत सुरु असलेल्या यां चोरीचा प्रकरणा संदर्भात परेश रविद्र उदेवाल रा.अमळनेर हा तरुण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून अन्न त्याग करून अमळनेर तहसील कार्यालया बाहेर उपोषणास बसलेला असुन परेश उदेवाल हा शासकीय मालमत्तेची परस्पर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत असुन शासनाच्या मालमत्तेची परस्पर विक्री करून डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे हा तरुण मागील काही दिवसापासून ओरडू ओरडू सांगत आहे.
ह्या कार्यवाहीत मोठे मोठे मासे गळाला लागतील तर काहीनी अगोदरच पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याशी साठे लोटे करून हा प्रकार दाबण्याच्यां प्रयन्त केल्या मुळे धडक कार्यवाही होत नसल्याचे बोलले जातं आहे.
यां पूर्वी पालिकेचे मुख्याधिकारी यांनी यां संदर्भात अहवाल मागवुन संबंधित कर्मचारी यांना नोटीसा देखील बजावल्या होत्या नोटीसा दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी खुलासा करतांना आमच्या ह्या गोष्टीशी एकमात्र संबंध नाही अश्या भाषेत उत्तर देवुन ह्या चोरी प्रकरणातुन व शहरातील अनाधिकृत पणे केलेल्या नळ कनेक्शन जोडणी बाबत आपली सुटका केली होती.
यासंदर्भात पालिकेचे मुख्य अधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी महादेव खेडकर तसेच अमळनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
जनतेची दिशाभूल करण्यासाठी पालिकेचे उप मुख्यधिकारी संदीप गायकवाड यांनी ऐका पत्रकांराला बाईट देऊन हा प्रकार खोटा आहे. असे म्हणत पत्रकारांचे प्रश्नाचे खांडण त्यांनी केले होतें.
तर जळोद गांधली वॉटर सप्लाय तसेच लालबाग टाकी येथील साहित्य गहाळ करून स्वतःची दिवाळी करणाऱ्यांवर मुख्याधिकारी काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
क्रमश: