June 29, 2025 3:48 pm

बैलांची निर्दयीपणे वाहनात कोंबून वाहतूक केल्याने अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल. तर ऐका बैलांचा मृत्यू.

अपनी भाषा में पढ़े! Translate

बैलांची निर्दयीपणे वाहनात कोंबून वाहतूक केल्याने अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल. तर ऐका बैलांचा मृत्यू.

अमळनेर : विक्की जाधव.

धुळे येथून तीन बैलांची निर्दयीपणे छोट्या वाहनात कोंबून अमळनेर मार्गे धरणगाव येथे विक्री साठी घेऊन जाणाऱ्या बैल मालक आणि गाडी चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबबात माहिती अशी की, १३ रोजी इकरार खान मुस्ताक खान वय ३५ रा कसाई वाडा धरणगाव हा चालक बापू परभत धनगर याने धुळ्यातून विकत घेतलेले तीन बैल विना परवाना दाटीवाटीने कोंबून अमळनेर मार्गे धरणगाव घेऊन जात असल्याचे अमळनेर च्यां काही तरुणांना समजले त्यांनी तिरंगा चौक येथे वाहन थांबवून विचारणा केली असता ड्रायव्हर इकरार खान मुस्ताक खान उडवा उडवी ची उत्तरे देत असल्याकरणे तरुणांनी वाहन पोलीस ठाण्यात घे अशी विनंती केली. यावेळी बैलांना दाटीवाटीने कोंबून निर्दयीपणे वाहतूक केल्याने वाहन चालक व बैल मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीसह तिन्ही बैल असा ३ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर सुसाट वाहन पळवील्याने ऐका बैलाचा मृत्यू झाला. असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत-

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!